Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझे सिनेमे फ्लॉप झाले अन्...' सारा अली खान झाली व्यक्त; जान्हवीसोबतच्या तुलनेवर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:40 IST

फ्लॉप करिअरवर व्यक्त झाली सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या साधेपणामुळे कायमच प्रेक्षकांचं मन जिंकते. 2018 साली आलेल्या 'केदारनाथ' सिनेमातून तिने पदार्पण केलं. यानंतर तिने 'सिंबा','लव्ह आज कल 2','अतरंगी रे','जरा हटके जरा बचके' या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र तिचे चित्रपट फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. यानंतर तिच्यासोबत नेहमी चांगलं वागणाऱ्या लोकांची वागणूक अचानक कशी बदलली हे तिने नुकतंच सांगितलं.

बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, "जे लोक मला आधी पार्टीसाठी आमंत्रण द्यायचे ते आता मी नाही आले तरी ओके असतात. सगळ्यांचं वागणं बदललं आहे याचं मला वाईट वाटलं. पण यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. मला आठवतं २०१८ मध्ये जेव्हा मला वाटलं मी जगात एकदम टॉपवर आहे. मला जे प्रेम मिळालं ते याआधी कधी मिळालं नव्हतं. पण यानंतर अचानक मी जमिनीवर आपटले. सारा तुला यावंच लागणार असं म्हणणारे लोक एका रात्रीत बदलले."

जान्हवी कपूरसोबत होणाऱ्या तुलनेवर सारा म्हणाली, "प्रत्येकाचं आपलं नशीब आहे. दुसऱ्यांसारखं बनायला गेलो तर प्रॉब्लेम होतो कारण प्रत्येकाचं स्वत:चं वेगळं टॅलेंट आहे."

सारा अली खानचा नुकताच 'मर्डर मुबारक' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. यामध्ये विजय वर्मा, करिष्मा कपूर, पंकज त्रिपाठी यांचीही मुख्य भूमिका आहे. याशिवाय ती सध्या आदित्य रॉय कपूरसोबत अनुराग बासूच्या 'मेट्रो इन दिनो' चं शूटिंग करत आहे.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसिनेमा