Join us

रणबीर कपूर नाही तर 'हा' अभिनेता होता 'संजू'साठी निर्मात्यांची पहिली पसंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 15:14 IST

अशातच आता खुलासा करण्यात आलाय की, संजय दत्त भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर पहिली पसंत नव्हता. 

मुंबई : राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेला 'संजू' हा सिनेमा येत्या 29 जूनला रिलीज झाला आहे. ट्रेलर आल्यापासूनच या सिनेमाबाबत वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. रणबीर कपूरला संजय दत्तच्या रुपात पाहणे प्रेक्षक पसंतही करत आहे. अशातच आता खुलासा करण्यात आलाय की, संजय दत्त भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर पहिली पसंत नव्हता. 

संजय दत्तचं लाइफ 'संजू' मधूल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यात रणबीरचा लूक पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या की, रणबीर शिवाय ही भूमिका कुणीही चांगली साकारु शकला नसता. पण आता सिनेमा रिलीज व्हायला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना सिनेमाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी खुलासा केलाय की, त्यांना असं अजिबात वाटत नव्हतं की, रणबीर संजूच्या भूमिकेट फिट बसेल. 

'संजू' या सिनेमासाठी विधु चोप्रा यांनी आधी रणबीर ऐवजी रणवीरची निवड केली होती. रणवीर सिंग हा निर्मात्यांची पहिली पसंत होता. विधु यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'जेव्हा राजकुमार हिराणीने मला सांगितलं की, या सिनेमासाठी त्याला रणबीरला कास्ट करायचं आहे. तेव्हा मी नाखूश होतो. मला असं वाटत होतं की, रणबीर सिंग ही भूमिका अधिक चांगली साकारेल. जे इमोशन रणवीर सिंग क्रिएट करतो ते कुणीही करु शकत नाही. पण रणबीरला कास्ट करण्याचा निर्णय हिराणीचा होता आणि तो त्यावर ठाम राहिला'. 

पुढे ते म्हणाले की, जेव्हा आम्ही संजू चं शूटिंग सुरु केलं आणि रणबीर संजय दत्त बनून समोर आला तेव्हा मला माझे शब्द परत घ्यावे लागले. रणबीरने संजय दत्तची आत्माही त्या भूमिकेत उतरवली आहे'.

टॅग्स :संजू चित्रपट 2018रणबीर कपूरसंजय दत्तरणवीर सिंगराजकुमार हिरानीबॉलिवूड