Join us

"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 09:10 IST

समीर चौघुलेंनी बायकोला शुभेच्छा देताना मोजक्या शब्दात मनातल्या भावना सांगितल्याच (samir choughule)

समीर चौघुले हे महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सुप्रसिद्ध कलाकार. गेली अनेक वर्ष विविध माध्यमांत समीर चौघुले अभिनय करत आहेत. समीर चौघुलेंनी विविध भूमिका करुन प्रेक्षकांना खळखळून हसवलं. समीर यांनी यदा कदाचित, वस्त्रहरण अशा नाटकांमधून रंगभूमीही गाजवली. समीर सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्याबद्दल व्यक्त होत असतात. अशातच समीर यांची पत्नी कविता यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने समीर यांनी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे.

समीर चौघुले यांनी पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "Kavita Choughule happy birthday... thank God I have you...तुझ्या विना माझं सतत "अडण" असच कायम राहू दे....खूप प्रेम तुला ......#wifebirthday" अशा मोजक्या शब्दात समीर चौघुले यांनी पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

समीर चौघुले हे अभिनेते आहेच शिवाय लेखकही आहेत. समीर यांनी आजवर महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये अभिनय केलाय. याशिवाय विविध कॉमेडी स्कीट त्यांनी लिहिले आहेत. याशिवाय समीर यांनी प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमात अभिनय केलाय. लवकरत समीर गुलकंद या मराठी सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सचिन गोस्वामी करत आहेत. सिनेमात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, ईशा डे हे कलाकार झळकणार आहेत.

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठीसई ताम्हणकरप्रसाद ओक