Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्याच्या 'या' कृतीमुळे भारावला समीर चौघुले, गिफ्ट पाहून तुम्हीही म्हणालं...क्या बात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 12:26 IST

चाहत्याचं प्रेम पाहून भारावला समीर चौघुले.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. महाराष्ट्राचा हा लाडका कार्यक्रम घराघरात पाहिला जातो. प्रत्येक घरात या शोचे चाहते आहेत. या शोमधील हास्यवीरांवर चाहते भरभरुन प्रेम करतात.  विनोदाचं अचूक टायमिंग साधत हास्याचे फवारे उडवणाऱ्या समीर चौघुलेचा चाहता वर्गही मोठा आहे. नुकतेच समीर चौघुलेच्या एका पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याने एका चाहत्यासाठी खास पोस्ट शेयर केली आहे. 

एका चाहत्याने घरातील भितींवर समीरचा फोटो लावला आहे. चाहत्याच्या या कृतीने समीरचं मन जिकलं. यावर समीरने भलीमोठी पोस्ट केली आहे. त्यानं लिहलं, 'हे असे चाहते आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे...लहानपणी माझ्या घराच्या भिंतीवर मी माझ्या आवडत्या हीरोजचे फोटो लावायचो... अमिताभ बच्चन, ब्रूस ली, जॅकी चॅन, पुल देशपांडे, चार्ली चॅप्लिन (द कीड), कपिल देव यांचा (८३ चा वर्ल्ड कप उचललेला) असे अनेक फोटो माझ्या घराच्या भिंतीवर, गद्रेच्या लोखंडी कपाटावर असायचे..तेंव्हा खरंच वाटलं नव्हतं. कोणी माझा फोटो आपल्या घराच्या भिंतीवर लावेल'.

 

तो म्हणाला,  'निखिल माने या माझ्या चाहत्याने माझ्या प्रेमापोटी माझे चित्र (हस्त आणि हसत चित्र) आपल्या घरातील भिंतीवर लावले आहे...माझ्यासाठी ही अत्यंतिक आनंदाची बाब आहे...स्ट्रेस आणि नैराश्याने भरलेल्या जीवनात आपण नकळतपणे अनेकांच्या मनाला उभारी, positivity, आनंद मिळण्याचे निमित्त ठरतो ही गोष्ट कधी कधी गहिवरून टाकते...आणि चाहत्यांचे प्रेम गुदमरवून टाकत... हास्याची ताकद किती मोठी आहे याची प्रचिती देणारी असंख्य उदाहरणे आम्ही हास्यजत्रेकरी रोज अनुभवतो'.

पुढे त्याने लिहले 'हे असे चाहते आणि त्यांचे प्रेम आमची कामाप्रती responsibility वाढवतात आणि विनोदाकडे जास्त गांभीर्याने पाहायला लावतात. प्रत्येक प्रहसनात ५०० टकके योगदान द्यायची उर्मी निर्माण करतात...प्रत्येक प्रयत्न सफल होतोच असं नाही..कधी उन्नीस बीस होतच...पण १०० टक्के प्रयत्न आणि मेहेनत करण्यात आम्ही कधीच compromise करत नाही...हे संपूर्ण श्रेय आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबाचे आहे...आणि आमच्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांचे ..तसेच सोनी मराठी या वाहिनीचे आहे...मी श्री. निखिल माने Nikhil Mane यांचे मनापासून आभार मानतो..खूप खूप प्रेम'. समीरच्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

टॅग्स :समीर चौगुलेसेलिब्रिटीटेलिव्हिजनमराठी अभिनेता