Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखलं का 'या' अभिनेत्रीला? साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्रीचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 18:30 IST

समांथाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती जाहिरात करताना दिसत आहे.

साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या यादीत समांथा रुथ प्रभूचं नाव पहिल्या क्रमांकाला आहे.  तिच्या सौंदर्याने अनेक चाहते प्रभावितही होतात. तिच्या फॅन्सची काही कमतरता नाही. ती तर तरूणांच्य हृदयाची धडकन आहे, असे म्हटले जाते. अभिनेत्रीच्या लूकवर आणि तिच्या साधेपणावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.  यातच समांथाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती जाहिरात करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीत समांथाला पाहून तिला ओळखणे फार कठीण आहे. यामध्ये समंथाचा अगदी वेगळा लूक पाहायला मिळतोय. ती दाक्षिणात्य भाषेत बोलत आहे. कपाळावरची छोटीशी बिंदी, साधा मेक-अप, गळ्यात हार या लुकमध्ये तिला ओळखणे कठीण आहे.  हा अवतार पाहून ती खरंच समंथा आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे. 

समंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तकाही दिवसांपूर्वीच समांथाचा ‘खुशी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता समंथा सिटाडेलच्या हिंदी व्हर्जनमध्ये वरुण धवनसोबत दिसणार आहे. तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

समंथा साऊथ इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा मध्ये 'ऊ अंटावा' गाण्याने तिला जगभरात पोहोचवलं. तर सिटाडेल’च्या शूटिंगनंतर समांथाने ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी समांथाने तिला मायोसायटिस नावाचा आजार झाल्याचा खुलासा केला होता. यामुळे तब्येतीकडे आणि स्वत:कडे लक्ष देण्यासाठी समांथाने काही काळ कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटी