Join us
Daily Top 2Weekly Top 5

समंथाला करिअरमधील वर्षभराचा ब्रेक महागात पडणार? कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:08 IST

'सिटाडेल' आणि 'कुशी' या  आगामी सिनेमांमध्ये समंथा मुख्य भूमिकेत आहे. नंतर...

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)  काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. समंथा मायोसायटिस या आजाराने त्रस्त आहे. गेल्या वर्षीच तिने या आजाराविषयीचा खुलासा सोशस मीडियावरुन केला होता. तर आता त्यावरील उपचारासाठी आणि एकंदर मन:शांतिसाठीच ती ब्रेक घेणार असल्याचं कळतंय. पण तिला हा ब्रेक चांगलाच महागात पडणार आहे.

'सिटाडेल' आणि 'कुशी' या  आगामी सिनेमांमध्ये समंथा मुख्य भूमिकेत आहे. दोन्ही प्रोजेक्ट्सचं शूट पूर्ण झालं आहे. मात्र यानंतर तिने कोणतेच प्रोजेक्ट्स स्वीकारलेले नाहीत. यामुळे ज्या निर्मात्यांकडून तिने अॅडव्हान्स घेतलंय तेही तिने परत केलंय. समंथाने एक वर्षाचा ब्रेक घेतल्यास तिला कोट्यवधींचं नुकसान होऊ शकतं. कारण समंथा एका सिनेमासाठी तीन ते चार कोटी रुपये घेते. तसंच अनेक ब्रँड शूटसाठीही ती कोट्यवधी रुपये घेते. म्हणूनच समंथाला हा एक वर्षाचा ब्रेक महागात पडू शकतो. तिला जवळपास १२ कोटींचं नुकसान होईल असा अंदाज ट्रेड एक्सपर्ट्सने व्यक्त केला आहे.

समंथाचा 'कुशी' हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. सप्टेंबर महिन्यात कुशी रिलीज होणार आहे. आर्मी ऑफिसर आणि जम्मू काश्मीरच्या मुलगी यांच्यातील एक थान लव्हस्टोरी असणार आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीसिनेमाबॉलिवूड