विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवून आहे. जेव्हा सलमान खान(Salman Khan)चा सिकंदर चित्रपट (Sikandar Movie) प्रदर्शित झाला तेव्हा असे वाटत होते की विकीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवरून बाहेर पडेल पण तसे झाले नाही. हा चित्रपट त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. अलिकडेच, या चित्रपटाने स्त्री २ ला मागे टाकले आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ७ वे स्थान मिळवले आहे, जे हिंदी चित्रपटासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
थिएटरमध्ये ५० दिवसांहून अधिक काळ प्रवास पूर्ण करणाऱ्या छावा या चित्रपटाने आठव्या आठवड्यात पुन्हा एकदा कमाईत वाढ केली आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे, हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. बॉक्स ऑफिस डेटा ट्रॅकिंग साइट Sakcinlk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने आतापर्यंत हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये एकूण ५९८.८० कोटी रुपये कमावले आहेत.
'छावा'ची दमदार कमाई पहिल्या आठवड्यात छावाने २२५ कोटींची कमाई केली. मग दुसऱ्या आठवड्यात १८६ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.९४ कोटी, चौथ्या आठवड्यात ४३.९८ कोटी, पाचव्या आठवड्यात ३१.०२ कोटी, सहाव्या आठवड्यात १५.६० कोटी आणि सातव्या आठवड्यात ७ कोटींचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे, चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई अंदाजे ६०२.३५ कोटी रुपये इतकी झाली आहे. मात्र, हे प्राथमिक आकडे आहेत, जे दिवसा अखेर बदलण्याची शक्यता आहे. छावाची वाढती लोकप्रियता याचा पुरावा आहे की चांगली कथा आणि दमदार सादरीकरण प्रेक्षकांना बराच काळ खिळवून ठेवू शकते. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
'छावा' सिनेमाबद्दलछावा चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, "छावा" हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. जो स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या शूर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत आहे. चित्रपटाची कथा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग आणि संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास दाखवते. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.