बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या आपल्या वडिलांच्या, म्हणजेच ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीमुळे चिंतेत आहे. सलीम खान यांच्यावर सध्या मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांकडून वडिलांच्या प्रकृतीबाबत सतत दिली जाणारी माहिती आणि मीडियातील अपडेट्समुळे सलमान खान प्रचंड नाराज झाला असल्याचे समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
काही दिवसांपूर्वी सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत मीडियाला सविस्तर माहिती दिली होती. यामुळे सलमान आणि खान कुटुंब अस्वस्थ झाले आहे. वडिलांच्या आरोग्याविषयीची माहिती हा अत्यंत खासगी विषय असून, डॉक्टरांनी अशी सार्वजनिक विधाने करू नयेत, असं मत सलमानने व्यक्त केले आहे.
रुग्णालय प्रशासनाकडे विशेष विनंती
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाने लीलावती रुग्णालय प्रशासनाकडे एक विशेष विनंती केली आहे. "सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही मेडिकल अपडेट्स परस्पर मीडियाला देऊ नका. तब्येतीशी संबंधित माहिती ही गोपनीय असते. चाहत्यांना काळजी असणे स्वाभाविक आहे, परंतु या प्रकरणातील कोणतीही अधिकृत माहिती केवळ कुटुंबाकडूनच दिली जाईल," असं स्पष्ट शब्दांत खान कुटुंबाने सांगितले आहे.
सलीम खान यांची प्रकृती कशी आहे?
रुग्णालयातील डॉ. जमील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना सौम्य 'ब्रेन हॅमरेज' झाला होता. त्यांच्यावर 'डीएसए' (Digital Subtraction Angiography) ही सर्जरी करण्यात आली आहे. सध्या ते ICU मध्ये असून त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. वाढत्या वयामुळे त्यांच्या रिकव्हरीचा वेग थोडा कमी असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
Web Summary : Salman Khan is reportedly unhappy with Lilavati Hospital for sharing Salim Khan's health information with the media. The family requested privacy and that updates only come from them. Salim Khan is recovering from a mild brain hemorrhage after undergoing DSA surgery.
Web Summary : खबर है कि सलीम खान के स्वास्थ्य की जानकारी मीडिया से साझा करने पर सलमान खान लीलावती अस्पताल से नाखुश हैं। परिवार ने गोपनीयता का अनुरोध किया और कहा कि अपडेट केवल उन्हीं से आने चाहिए। डीएसए सर्जरी के बाद सलीम खान हल्के ब्रेन हेमरेज से उबर रहे हैं।