Join us

सलमान खानने 'छावा' पाहून केलं मोठं वक्तव्य, म्हणाला- "सिनेमाने ५०० कोटी कमावलेत त्यामुळे..."

By देवेंद्र जाधव | Updated: March 31, 2025 16:59 IST

Salman Khan on Chhaava Movie: सलमान खान 'छावा' सिनेमाविषयी काय म्हणाला. भाईजानने केलेल्या वक्तव्याची चर्चा.

विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केलाय. 'छावा'सिनेमा पाहून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कलाकाराचं खूप कौतुक केलंय. अशातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) 'छावा'सिनेमाबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'छावा'मधील अभिनेत्री रश्मिका मंदानासमोरच (Rashmika Mandanna) सलमान खानने 'छावा' सिनेमा कसा वाटला, याविषयी सांगितलं आहे.

सलमान खानला कसा वाटला 'छावा'

सलमान खानने सिकंदर सिनेमानिमित्त एका ठिकाणी मुलाखत दिली. तेव्हा सलमानला 'छावा' विषयी विचारण्यात आलं. 'छावा'सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणारी रश्मिका मंदाना 'सिकंदर' सिनेमात सलमान खानसोबत झळकत आहे. त्यावेळी रश्मिकासमोर सलमान 'छावा' बद्दल म्हणाला की, "छावा खूप चांगला सिनेमा आहे. विकीने खूप चांगलं काम केलंय. याशिवाय रश्मिकानेही चांगलं काम केलंय."

"शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्याशिवाय इतरही अनेक कलाकार आहेत. नवीन पिढीमधील शाहिद कपूर, वरुण धवन, रणवीर सिंग, रणबीर कपूर,विकी कौशल आणि इतरही अनेक कलाकार आहेत. विकीच्या छावाने ५०० कोटींच्या वर व्यवसाय केलाय. त्यामुळे फक्त शाहरुख-आमिर-सलमान ही तीन नावंच का? फक्त या तीन नावांनी बॉलिवूडला ओळखत नाहीत. त्यामुळे इतरही अनेक कलाकार आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री, यांचंही नाव घेतलं पाहिजे.",अशाप्रकारे सलमानने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :सलमान खान'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाबॉलिवूड