Join us

भाईजानचा Video पाहून चाहते पडले चिंतेत, म्हणाले, "थोडा ब्रेक घेऊन तब्येतीकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 13:01 IST

सलमानची अवस्था बघून चाहत्यांनी त्याला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

बॉलिवूडचे तीनही खानांनी आता पन्नाशी पार केली आहे. सलमान, शाहरुख आणि आमिर सुमारे ५७-५८ वर्षांचे आहेत. या वयातही ते बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहेत. 'पठाण','जवान' मधून शाहरुखने तर दाखवलंच आहे. तसंच सलमानही 'टायगर 3'मधून आपला जलवा दाखवणार आहे. नुकतंच सलमान खानचा (Salman Khan) एका लग्नात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये सलमानची अवस्था बघून चाहत्यांनी त्याला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

सलमान खानचा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये तो डान्स परफॉर्म करत आहे.  'सजन रेडिओ..' या गाण्यावर सलमान डान्स मूव्ह्ज दाखवत आहे. हा दिल्लीत झालेल्या एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ आहे. सिल्व्हर जॅकेटमध्ये सलमान फारच डॅशिंग दिसतोय. मात्र त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघितले तर तो प्रचंड वैतागलेला, त्रासलेला दिसतोय.

सलमानचा हा व्हिडिओ चाहत्यांनी शेअर करत त्याला तब्येतीची काळजी घेण्याचे सल्ले दिले आहेत. तसंच 'टायगर 3' नंतर थोडा ब्रेक घे आणि तब्येतीकडे लक्ष दे. नंतर परत ये. असं दुर्लक्ष करुन तर चालणार नाही' अशीही कमेंट एका चाहत्याने केली आहे. 

सलमानच्या 'टायगर 3' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचा एक टीझर रिलीज झाला. यामध्ये टायगर आता गद्दाराच्या भूमिकेत गेल्याची हिंट त्याने दिली. टीझर पाहिल्यानंतर आता ट्रेलरची उत्सुकताही ताणली आहे. सिनेमात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत आहे. इमरान हाश्मी खलनायक साकारत आहे. मनीष शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यावर्षी सिनेमा रिलीज होत आहे.

टॅग्स :सलमान खाननृत्यसोशल मीडियाआरोग्य