Join us

कपाळावर रक्त अन् नजरेत देशभक्ती; सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमातील लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:00 IST

'बॅटल ऑफ गलवान' सिनेमातील सलमान खानचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर समोर आला आहे.

सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे, जो त्याच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. या फोटोमध्ये सलमान खान एका सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने लष्करी गणवेश परिधान केला असून, त्याच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

सलमान खानचा फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये सलमान लष्करी गणवेशात असून, त्याच्या कपाळावरून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे, आणि समोर ॲक्शनसाठी क्लॅपबोर्ड ठेवलेला आहे. सलमानने शेअर केलेला हा फोटो समोर येताच भाईजानच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ''भाई पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे'', ''थिएटरमध्ये आता राडा होणार'', ''एका ऐतिहासिक सिनेमासाठी सज्ज व्हा', अशा शब्दांमध्ये सलमान खानच्या चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर कमेंट्स करुन आगामी सिनेमाबद्दल उत्सुकता दर्शवली आहे.

'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाविषयी

'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीनच्या लष्करी संघर्षावर आधारित आहे, जो भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी बनवला जात आहे. या चित्रपटात सलमान खान कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'शूटआउट एट लोखंडवाला' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अपूर्व लाखिया करत आहेत.  चित्रपटात चित्रांगदा सिंह, जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हिरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज यांसारखे कलाकारही दिसणार आहेत. सर्वांना भाईजानच्या या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडचित्रांगदा सिंग