मुंबईत नुकतीच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या अभिनयाने सजलेल्या 'इक्कीस' या चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग पार पडली. या कार्यक्रमात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान उपस्थित होता. यावेळी सलमान त्याच्या स्वॅगमध्ये फोटोशूट करत होता. परंतु आपल्या लाडक्या धर्मेंद्र यांचं पोस्टर पाहताच सलमान खान अत्यंत भावुक झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
धर्मेंद्र यांचं पोस्टर पाहून सलमान भावुक
व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसतं की, सलमान खान जेव्हा रेड कार्पेटवर येतो तेव्हा सुरुवातीला तो सर्वांसमोर फोटोशूट करतो. परंतु नंतर मागे असलेल्या धर्मेंद्र यांच्या 'इक्कीस' चित्रपटाच्या पोस्टरकडे तो बराच वेळ पाहत राहतो. काहीवेळ तो शांतपणे त्या पोस्टटरकडे बघत राहतो. नंतर पुन्हा पापाराझींकडे पाहून फोटोशूटसाठी उभा राहतो. सलमानने यावेळी मीडियाशी काहीही संवाद साधला नाही, तरीही त्याचे शांत डोळे खूप काही सांगून जातात.
धर्मेंद्र आणि सलमान खान यांचं नातं अत्यंत घट्ट आणि भावनिक होते. धर्मेंद्र नेहमीच सलमानला आपला 'तिसरा मुलगा' मानत असत. नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या भागातही जेव्हा धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तेव्हा सलमान खान ढसाढसा रडला होता. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या धर्मेंद्र यांच्या निधनामुळे सलमान खानला वैयक्तिकरित्या खूप मोठा धक्का बसला आहे.
धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट असलेला 'इक्कीस' १ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारताचे सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत असून श्रीराम राघवन यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या स्क्रीनिंगला सनी देओल आणि बॉबी देओल देखील हजर होते.
Web Summary : Salman Khan became emotional at the screening of ' इक्कीस' after seeing Dharmendra's poster. A video of Salman looking at the poster is viral. Dharmendra considered Salman as his third son. ' इक्कीस' releases on January 1, 2026.
Web Summary : 'इक्कीस' की स्क्रीनिंग में धर्मेंद्र का पोस्टर देखकर सलमान खान भावुक हो गए। पोस्टर को देखते सलमान का वीडियो वायरल हो रहा है। धर्मेंद्र, सलमान को अपना तीसरा बेटा मानते थे। 'इक्कीस' 1 जनवरी, 2026 को रिलीज होगी।