Join us

"माझ्या मालकाचा वाढदिवस..." सलमान खानसाठी बॉडीगार्ड शेराची खास पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:09 IST

सलमान खानसाठी त्याचा बॉडीगार्ड शेराने खास पोस्ट शेअर केली आहे. 

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानचा आज वाढदिवस. सलमान आज ५९ वर्षांचा झालाय. सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे जगभरातील करोडो चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.  दरवेळेप्रमाणेच यावेळी सलमान खानसाठी त्याचा बॉडीगार्ड शेराने खास पोस्ट शेअर केली आहे. 

शेराने इन्स्टाग्रामवर सलमान खानसोबतचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "माझ्या मालकाचं वाढदिवस... खूप प्रेम". शेराची ही पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  सलमान खान आणि शेरा यांच्यातील बाँडिंग खूप जुनी आणि खास आहे.  शेरा गेल्या कित्येक वर्षांपासून सलमान खानची सुरक्षा सांभाळतोय. सलमान खानसाठी शेरा हा केवळ बॉडीगार्ड नाही तर तो त्याच्या भावासारखा आहे. 

दरम्यान, सलमान खानच्या 59 वा वाढदिवसानिमित्त 26 डिसेंबरच्या रात्री वाढदिवसाची पार्टी झाली. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. रितेश देशमुख आणि जेनेलिया हे प्रसिद्ध जोडपं देखील या पार्टीत सहभागी झाले होते.   अभिनेत्याचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा झाला. आज सलमानचेही चाहते देखील आनंदी आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत.  

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटी गणेशबॉलिवूड