Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचं 'रॉयल' कपल सैफ अली खान-करीना कपूर वेगवेगळे राहणार? 'या' कारणामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:33 IST

सैफ अली खान या निर्णयामुळे खूपच उत्सुक?

बॉलिवूडचे रॉयल कपल सैफ अली खान आणि करीना कपूर खान दोघंही आपापल्या कामात अव्वल आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमाची चर्चा तर होतेच शिवाय सिनेमा हिटही होतो. या जोडीने आतापर्यंत तीन सिनेमात एकत्र काम केले आहे. ते तीनही चित्रपट फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. सैफ-करिनाची ऑनस्क्रीन जोडी अद्याप प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली नाही. पण आता दोघांनी यासाठी आणखी एक संधी द्यायचं ठरवलं आहे. आगामी एका प्रोजेक्टमध्ये सैफ-करीना एकत्र काम करणार आहेत. 

सैफ-करीनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी एका प्रोजेक्टसाठी दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. नुकतंच त्यांनी हे कन्फर्म केले. तसंच प्रोजेक्टबद्दल अधिक माहितीही दिली. फिल्म कंपॅनियनला दिलेल्या मुलाखतीत करीना आणि सैफने बातमीला दुजोरा दिला. करीना म्हणाली, "आम्हाला एकत्र काम करायचं असतं पण चांगले प्रोजेक्ट्सच मिळत नाहीत. कदाचित यापूर्वीच्या आमच्या सिनेमांमुळेही सैफ आता एकत्र काम करण्यापूर्वी विचार करतो. पण आता ज्या प्रोजेक्टवर आमची चर्चा सुरु आहे त्यासाठी सैफने होकार दिला आहे."

ती पुढे म्हणाली, "आम्ही याआधी तीन सिनेमात एकत्र काम केलं. तीनही चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे आम्ही सोबत काम नाही केलं पाहिजे असं बोललं गेलं. पण मला वाटतं जर सिनेमा चांगला असेल तर प्रेक्षक आम्हाला नक्कीच स्वीकारतील. आता आम्हाला एक नवीन प्रोजेक्ट खरोखरंच आवडला आहे."

याच मुलाखतीत सैफने खुलासा केला की, "हा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये मी आणि करीना लग्न झालेलं जोडपं असणार आहोत. मात्र कहाणीत अनेक ट्विस्ट असणार आहेत जे पाहणं इंटरेस्टिंग आहे." तसंच सैफ गंमतीत म्हणाला, 'यावेळी मी नक्कीच चांगला अभिनय केलं.'

शूटवेळी सैफ-करीना सोबत राहणार नाहीत

सैफ म्हणाला, "मला वाटतं सिनेमा बनत असताना आपण सोबत नाही राहिलं पाहिजे. मी वेगळ्या खोलीत राहीन नाहीतर हे जरा अतीच होईल. आपल्याला रोमान्स करण्याची संधी मिळेल. आपण सेटवर भेटू आणि बोलू हाय! मला ही कल्पनाच खूप आवडत आहे. भले दूर नाही पण कमीत कमी वेगवेगळ्या खोलीत तरी राहूच शकतो."

सैफ-करीनाने 'टशन', 'एजंट विनोद', आणि 'कुर्बान' सिनेमात एकत्र काम केलं होतं. 'टशन' सिनेमावेळीच दोघंही प्रेमात पडले होते. सिनेमाच्या सेटवर त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. ऑफस्क्रीन प्रेक्षकांची आवडती ही जोडी ऑनस्क्रीन मात्र अजूनपर्यंत यशस्वी झालेली नाही. आता या आगामी सिनेमाकडून त्यांना अपेक्षा आहेत.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरबॉलिवूडसिनेमा