Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूरचंच नाही तर सैफ अली खानचंही आहे सीक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 19:24 IST

इन्स्टाग्राम फारसं वापरत नसल्याचं कारणही सांगितलं, अप्रत्यक्षपणे ब्रँड्सला लगावला टोला

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यातच इन्स्टाग्राम हे अॅप जगप्रसिद्ध आहे. यावरुन सेलिब्रिटींची तर बक्कळ कमाईही होते. पण असेही काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत जे सोशल मीडियापासून स्वत:ला दूरच ठेवतात. त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंटही नाही. राणी मुखर्जी, रणबीर कपूर, सैफ अली खान हे त्यापैकीच काही कलाकार. रणबीर कपूर प्रत्यक्ष नसला तरी त्याचं सीक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट आहे हे आता सगळ्यांनाच माहितीये. पण सैफ अली खानचंही (Saif Ali Khan) असंच एक सीक्रेट अकाऊंट असल्याचा खुलासा त्याने स्वत:च केला आहे.

सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खान सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. बेबोचे बरेच चाहतेही आहेत. पण सैफ या सगळ्या गोष्टींपासून दूरच असतो. आता नुकतंच त्याने सीक्रेट अकाऊंटबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम अॅप आहे आणि एक सीक्रेट अकाऊंटही आहे. मी कधी कधी ते पाहतो पण मला फार मजा येत नाही. मी थोडावेळ ते स्क्रोल करत, नंतर डिलीट करु असं म्हणतो पण शेवटी माझ्याकडून डिलीट मात्र होत नाही."

सोशल मीडियापासून दूर राहण्याचं सांगितलं कारण

सैफ म्हणाला, "माझं फार स्पष्ट आहे. मला माझ्या गोष्टी ऑनलाईन दाखवण्यात रस नसतो. म्हणून मी सोशल मीडियापासून दूरच राहतो. तसंच दुसऱ्या लोकांच्या गोष्टी पोस्ट करण्याची वेळ माझ्यावर येऊ नये मला त्यात पडायचं नसतं. मी त्यापासून लांब आहे म्हणून मला एकदम शांत वाटतं कारण मला कोणीही सोशल मीडियावर काहीही प्रमोट करायला सांगत नाही."

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडसोशल मीडिया