Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण'च्या सेटवरुन साई पल्लवीचे आणखी फोटो व्हायरल, केशरी रंगाच्या साडीत दिसते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:44 IST

माता सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीचा आणखी एक लूक पाहिलात का?

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) हिंदीतील मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. नितेश तिवारींच्या 'रामायण' (Ramayan)सिनेमात ती माता सीतेच्या भूमिकेत आहे. तर रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. काही महिन्यांपूर्वी रणबीर आणि साई पल्लवीचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. आता साई पल्लवीचे आणखी काही फोटो लीक झाले आहेत. यामध्ये साईचा थोडा वेगळा लूक दिसतोय.

साई पल्लवी सध्या मुंबईत 'रामायण'च्या शूटिंगसाठी आली आहे. केशरी रंगाच्या साडीतील तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. 'रामायण' च्या शूटिंगवेळेसचेच हे फोटो आहेत. तिने केसांचा छान अंबाडा बांधला आहे आणि मोजकेच साधे दागिने घातले आहेत. साई पल्लवीला या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

नुकतंच सनी देओलनेही 'रामायण'मधील त्याच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं. तो सिनेमात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. अद्याप त्याने शूटिंगला सुरुवात केलेली नाही. हा सर्वात मोठ्या सिनेमांपैकी एक असणार असंही तो म्हणाला. 

'रामायण'सिनेमा दोन भागांमध्ये बनणार आहे. याचा पहिला भाग २०२६ साली रिलीज होणार आहे तर दुसरा भाग २०२७ मध्ये येणार आहे. सिनेमात यश रावणाच्या भूमिकेत आहे. तर टीव्ही अभिनेती रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :साई पल्लवीरामायणबॉलिवूडव्हायरल फोटोज्