कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमात कंगनाने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारलीय. कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच कंगना राजकीय क्षेत्रातील विविध व्यक्तींसाठी 'इमर्जन्सी' सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवत आहे. नुकतंच कंगनाने सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यासाठी 'इमर्जन्सी' सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. त्यावेळी सिनेमा पाहून सद्गुरु काय म्हणाले बघा.
'इमर्जन्सी' पाहून सद्गुरु काय म्हणाले?
काल कंगनाने सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यासाठी 'इमर्जन्सी' सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. त्यावेळी सिनेमा पाहिल्यावर सद्गुरु म्हणाले की, "भारताला आणीबाणी लागून ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आपल्या इतिहासाला जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहणं आवश्यक आहे. तरुण पिढीने हा सिनेमा बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला भारताच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी कळतील. ही भूमिका साकारणं खूप कठीण काम होतं. पण कंगनाने अतिशय उत्कृष्टपणे ही भूमिका साकारली आहे."
अशाप्रकारे सद्गुरु यांनी 'इमर्जन्सी' सिनेमा पाहून कंगना राणौत आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं. कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा काल १७ जानेवारीला रिलीज झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन कंगनानेच केलं असून सिनेमात श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, अनुपम खेर, मिलिंद सोमण यांची भूमिका आहे. सिनेमा या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.