Join us

मुग्धा वैशंपायनच्या घरी लगीनघाई, मोठी बहीण मृदुलच्या हळदीचे फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 14:37 IST

वैशंपायन कुटुंबात लगीनघाई सुरु आहे.

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधून प्रसिद्धीझोतात आलेली सर्वांची लाडकी मॉनिटर म्हणजेच मुग्धा वैशंपायनने (Mugdha Vaishampayan) काही महिन्यांपूर्वीच प्रेमाची कबुली दिली. सारेगमप मधलाच सर्वांचा लाडका मोदक म्हणजेच प्रथमेश लघाटेसोबत तिचा साखरपुडाही झाला. आता वैशंपायन कुटुंबात लगीनघाई सुरु आहे. पण लग्न मुग्धाचं नसून तिची मोठी बहीण मृदुल लग्नबंधनात अडकत आहे. मुग्धाने हळदीचा फोटो शेअर केला आहे. 

मुग्धा वैशंपायनला मोठी बहीण आहे जिचं नाव मृदुल आहे. मुग्धाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तसंच इतर ठिकाणी मुग्धासोबत तिची ताई दिसत असते. मृदुल लवकरच लग्नबंधनात अडकत असून नुकतीच तिची हळद पार पडली आहे. मुग्धाने मृदुलसोबतचा एक फोटो शेअर केलाय ज्यामध्ये दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तर प्रथमेशनेही मृदुलच्या मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. 

मृदुल जोगळेकर कुटुंबाची सून होणार आहे. जोगळेकर फार्म्स अलिबाग मध्ये प्रसिद्ध आहे. वैशंपायन आणि जोगळेकर कुटुंबाची ओळख आहे.  मृदुलनंतर मुग्धा कधी लग्न करतेय असा प्रश्न चाहते विचारत आहेत. अद्याप मुग्धाने तिच्या लग्नाबद्दल अधिकृत काहीही सांगितलेले नाही. 

टॅग्स :सा रे ग म पपरिवारलग्नमराठी गाणी