Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तची सायकोथेरपिस्ट मुलगी त्रिशालाने दिलं वडिलांच्या ड्रग्स अ‍ॅडिक्शनवर उत्तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 14:12 IST

एका यूजरने विचारले विचारले की, तू एका सायकॉलॉजिस्ट आहे. तुझ्या वडिलांच्या ड्रग अ‍ॅडिक्टबाबत तुला काय सांगायचंय?

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त सायकोथेरपिस्ट आहे. ती सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव राहते. इन्स्टाग्रामवर त्रिशालाने फॉलोअर्सच्या प्रश्नांना काही उत्तरे दिली आहेत. एका यूजरने तिचे वडील संजय दत्त यांच्या ड्रग अ‍ॅडिक्शनसंबंधी एक प्रश्न विचारला आहे. यावर त्रिशालाने लांबलचक आणि फार चांगलं उत्तर दिलं आहे. हे उत्तर तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलंय.

एका यूजरने विचारले विचारले की, तू एका सायकॉलॉजिस्ट आहे. तुझ्या वडिलांच्या ड्रग अ‍ॅडिक्टबाबत तुला काय सांगायचंय? यावर त्रिशालाने उत्तर दिलं की, 'पहिला बाब तर हे ध्यानात घेतलं पाहिजे की, अ‍ॅडिक्शन हा एक क्रॉनिक डिजीज आहे. ज्यात ड्रग्स घेणं गरजेचं होऊन बसतं आणि व्यक्ती कंट्रोल करू शकत नाही. पण याचे परिणाम फार नुकसानकारक असतात. सुरूवातीला सगळे लोक आपल्या इच्छेने ड्रग घेतात, पण पुन्हा पुन्हा ड्रग घेतल्याने मेंदूत बदल होतो आणि ती व्यक्ती स्वत:वरील नियंत्रण हरवून बसते. मेंदू ड्रग्स घेण्यास रोखणारी इच्छाशक्ती रोखू लागतेय.

तिने पुढे लिहिले की, मेंदूत इतके खोलवर बदल होतात की, हा आजार पुन्हा परत येणारा मानला जातो. ड्रग्सच्या वापराने डिसऑर्डरचे शिकार झालेले लोक जेव्हाही ठिक होण्याच्या प्रक्रियेत असतात तेव्हा पुन्हा ड्रगकडे परत येऊ शकतात. मग त्यांनी कितीही वर्षांआधी ड्रग्स सोडलं असेल. वडिलांवर गर्व आहे...

त्रिशालाने लिहिले की, 'माझ्या वडिलांच्या जुन्या ड्रग अ‍ॅडिक्शनच्या विषयी सांगायचं तर ते नेहमी ठीक होण्याच्या प्रक्रियेत राहतील. हा एक आजार आहे ज्यासोबत त्यांना दररोज लढायचं आहे. आता तर ते ड्रग्स घेतही नाहीत. मला माझ्या वडिलांवर गर्व आहे. त्यांनी हे मान्य केलं की, त्यांना ही समस्या होती. ते मदतीसाठी समोर आले. यात जराही लाज वाटण्यासारखं काहीच नाही.

टॅग्स :संजय दत्तबॉलिवूडसोशल मीडिया