Join us

RRR Movie: हॉलिवूड दिग्दर्शकाला ‘RRR’ची भुरळ , म्हणाला- ‘मी चुकीच्या देशात काम करतोय…’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:21 IST

एसएस राजामौली यांचा पीरियड अॅक्शन ड्रामा 'RRR' देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे.

RRR Movie: साऊथचे सुपरस्टार दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा पीरियड अॅक्शन ड्रामा 'RRR' देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांसह जगभरातील प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरणने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. चित्रपटाची कथा, दोन्ही अभिनेत्यांचा अभिनय, व्हीएफएक्स आणि अॅक्शन सीन्स, ही चित्रपटाची जमेची बाजू आहे.

दरम्यान, हा चित्रपट पाहून हॉलिवूडचे दिग्दर्शकही भारावून गेले आहेत. 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनियल क्वान यांनी एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'चे तोंडभरुन कौतुक केले आहे. त्यांनी चित्रपटाला ओव्हर द टॉप म्हटले आहे. डॅनियलने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॅनियलने ट्विट केले की, "एका वर्षापासून व्यस्त होतो, पण आता मला माझ्या बकेट लिस्टमधल्या गोष्टी करता आल्या. पहिले म्हणजे, मी माझा टॅक्स भरला आणि दुसरे म्हणजे 'RRR' चित्रपट पाहिले. जेव्हा मी भारतीय अॅक्शन फिल्म पाहतो, तेव्हा मला वाटते की मी चुकीच्या देशात काम करतोय. RRR हा एक अतिशय विलक्षण चित्रपट आहे," अशी प्रतिक्रिया डॅनियलने दिली.

टॅग्स :आरआरआर सिनेमाबॉलिवूडहॉलिवूडएस.एस. राजमौली