Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिंघम, सिंबा आणि सूर्यवंशीनंतर रोहित शेट्टी शोधतोय चौथा पोलिसवाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:55 IST

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शेट्टी सिंघम, सिम्बा व सूर्यवंशी नंतर आणखीन एका पोलिसवालाच्या शोधात आहे.

 

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध एक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी आगामी एक्शन ड्रामा सिंघम, सिंबा व सूर्यवंशीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. हा पहिलाच चित्रपट आहे ज्यात दोन मोठे कलाकार फक्त चित्रपटात केमिओ करणार नाहीत तर ते कथानाकातील महत्त्वाचं पात्र असणार आहेत.

रोहित शेट्टीने जेव्हापासून सूर्यवंशीचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे तेव्हापासून लोक रोहित शेट्टीला विचारत आहेत की यावेळी कॉप युनिव्हर्समध्ये कोणाची एन्ट्री पहायला मिळणार आहे ? रोहित शेट्टीने त्याच्या बाजूने क्लीअर केले आहे की यावेळी कोणत्याही पोलिसवाल्याची एन्ट्री होणार नाही आहे कारण त्यामुळे त्याच्यावर दडपण येते.

मिड डेच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी सिंघम, सिम्बा व सूर्यवंशी नंतर आणखीन एका पोलिसवालाच्या शोधात आहे. सूत्रांनी मिड डेला दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशीनंतर रोहित शेट्टी आपलं संपूर्ण लक्ष गोलमाल सीरिजकडे देणार आहेत. यादरम्यान त्यांचा लेखक नवीन पात्र शोधणार आहे, जो सिंबा, सिंघम व सूर्यवंशीपेक्षा वेगळं असणार आहे.

रोहित शेट्टीचा हा नवीन पोलिसवाला देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडणाऱ्या प्रकरणांवर काम करताना दिसणार आहे. त्यासाठी त्याच्या डोक्यात या पात्रासाठी काही कलाकारांची नावं आहेत. जसे की सिंबामध्ये सूर्यवंशीला लोकांना भेटवले होते. तसेच सूर्यवंशीमध्ये तो नवीन पोलिसवाल्याला भेटवणार आहे. त्यामुळे नवीन पोलिसवाला कोण असणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

सूर्यवंशी चित्रपटाबद्दल सांगायचं तर या चित्रपटाची रिलीज डेट कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

रोहित शेट्टीने इतर निर्मात्यांसोबत मिळून हा निर्णय घेतला की जोपर्यंत देशातील स्थिती सामान्य झाल्यानंतर सूर्यवंशी प्रदर्शित केला जाणार आहे.

टॅग्स :सूर्यवंशीअजय देवगणरोहित शेट्टीअक्षय कुमार