Join us
Daily Top 2Weekly Top 5

#LMOTY2023: 'या' एका कारणामुळे जेनेलियाची झाली 'वेड'साठी निवड; अखेर रितेशने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 20:39 IST

Riteish deshmukh: या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. परंतु, या सिनेमासाठी जेनेलियाची निवड का करण्यात आली या मागचं कारण त्याने नुकतंच सांगितलं आहे.

महाराष्ट्राचा लाडका लेक रितेश देशमुख याने 'वेड' या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या या पहिल्या मराठी सिनेमामधून त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिनेही मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यामुळे या सिनेमाची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा रंगली. इतंकच नाही तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. परंतु, या सिनेमासाठी जेनेलियाची निवड का करण्यात आली या मागचं कारण त्याने नुकतंच सांगितलं आहे.

'वेड' या सिनेमात जेनेलियाने श्रावणी ही मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, या सिनेमासाठी केवळ जेनेलियाचीच निवड का करण्यात आली हा प्रश्न वारंवार रितेशला विचारण्यात येत होता. त्यामुळे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' (Lokmat Maharashtrian Of The Year 2023) या पुरस्कार सोहळ्यात रितेशने त्यामागचं कारण सांगितलं आहे.

'मला तेव्हाही काम नव्हतं आणि आताही'; पुरस्कार सोहळ्यातील रितेशचं वक्तव्य चर्चेत

'घरी जेनेलियासोबत भांडण झाल्यानंतर सेटवर एकमेकांशी वेगळ्या टोनमध्ये बोलता का?' असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत रितेशने सिनेमात जेनेलियाला का घेतलं या मागचं कारणही सांगितलं. "नाही असं कधी झालं नाही. पण, मला सगळेच विचारतात की 'वेड'साठी जेनेलियालाच का घेतलं? तर मला असं वाटतं, की प्रत्येक नवऱ्याला कुठे तरी वाटत असतं की बायकोला म्हणावं बस्स, आता कट..हे सर्वांना शक्य नाहीये. पण माझ्या व्यावसायामुळे मला ते शक्य झालं. आता इथे असे बरेच जण आहेत की ज्यांना असं वाटतं घरी जाऊन बायकोला म्हणावं आता बस्स झालं. पण त्यांना ते शक्य होत नाही. पण, मी ते शक्य करुन घेतलं", असं मजेशीर उत्तर रितेशने दिलं.

दरम्यान,  रितेश आणि जेनेलिया हे कलाविश्वातील लाडकं कपल असून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड प्रेम मिळतं. ही जोडी बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे मजेशीर व्हिडीओ, रिल्स शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्यातील उत्तम केमिस्ट्री कायम नेटकऱ्यांना पाहायला मिळते. 

टॅग्स :रितेश देशमुखवेड चित्रपटजेनेलिया डिसूजासिनेमा