Join us

लग्न कधी करणार? ऋषी सक्सेनाने घेतलं ईशाचं नाव; म्हणाला, "मी तयारच आहे पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 16:34 IST

ऋषी सक्सेना आणि ईशाची जोडी लोकप्रिय आहेच. पण आता हे दोघं लग्न कधी करणार माहितीये का?

'काहे दिया परदेस' मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता ऋषी सक्सेना (Rishi Saxena) सध्या मालिका, सिनेमा अशा सगळ्याच माध्यमात काम करत आहे. त्याचा 'मल्हार' सिनेमा उद्यापासून प्रदर्शित होतोय. शिवाय ऋषीची 'आई कुठे काय करते' मालिकेतही एन्ट्री होत आहे. दरम्यान ऋषीने नुकतंच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे. ऋषी आणि अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता हे दोघं लग्न कधी करणार याचं त्याने उत्तर दिलं आहे. 

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना मराठीतील क्युट कपल आहे. सोशल मीडियावर दोघंही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत असतात. मग आता हे कपल लग्न कधी करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 'मित्रम्हणे लाईमलाईट'ला दिलेल्या मुलाखतीत ऋषी सक्सेना म्हणाला, "मला खरंच माहित नाही. बघुया, असं नाही की मला लग्न नाही करायचं पण कधी करायचं ते माहित नाही. हे ईशावरच अवलंबून आहे. माझ्यावरच कधीच अवलंबून नसतं. त्यामुळे तिलाच विचारा. मी तर तयारच आहे. पण जेव्हा ती तयार असेल ती मला सांगेल तेव्हा होईल."

अशी सुरु झाली लव्हस्टोरी!

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात. २०१८ मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत ऋषीच्या शांत स्वभावावर ईशा भाळली होती. अर्थात पहिल्या भेटीत काहीही बोलणं झालं नव्हतं. यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांचं बोलणं सुरू झालं आणि ईशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. पुढे मैत्री बहरली आणि एक दिवस ही मैत्री प्रेमाच्या कबुलीपर्यंत आली.

टॅग्स :ऋषी सक्सेनाईशा केसकरमराठी अभिनेतारिलेशनशिपलग्न