पुणे: आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड गदारोळानंतर मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरु झाली.शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंच्या स्वप्नातला एक प्रोजेक्ट सत्यात उतरला. अर्थात नाईट लाईफच्या निर्णयावर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया सर्वच वयोगटातून समोर आल्या. पण लाखों तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेल्या या सैराट फेम आर्चीला अर्थात रिंकू राजगुरूला जेव्हा नाईट लाईफविषयी तिचं मत विचारलं तेव्हा तिच्या उत्तराने उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली, नाईट लाईफ म्हणजे काय? ते मला माहित नाही. रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदागिरकर यांचा '' मेकअप '' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर पत्रकार भवन येथे दाखवण्यात आला. त्यावेळी आयोजित पत्रकार एक पत्रकाराने रिंकूला नाईट लाईफबद्दल विचारले असता. रिंकू म्हणाली, नाईट लाईफ म्हणजे काय असते हे मला माहित नाही. परिषदेला लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित उपस्थित होते.
नाईट लाईफ विषयी रिंकू राजगुरूचं " हे " उत्तर ऐकून तुम्हाला बसेल शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:15 IST
रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदागिरकर यांचा '' मेकअप '' चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय..
नाईट लाईफ विषयी रिंकू राजगुरूचं हे उत्तर ऐकून तुम्हाला बसेल शॉक
ठळक मुद्देगेला महिनाभर नाईट लाईफ विषयी जोरदार चर्चा