Join us
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी गोऱ्या मुलींशी लग्नाची भाषा करणाऱ्या भाजपा आमदारावर भडकली रिचा; काय म्हणाली वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:13 IST

विक्रांत सैनी यांनी केलेल्या काश्मिरी गोऱ्या मुलींच्या लग्नावर केलेल्या विधानामुळे बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाचा संताप अनावर झाला आहे

 जम्मू काश्मीरमधून जेव्हापासून कलम ३७० हटविण्यात आला आहे तेव्हापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. लोक वेगवेगळ्या प्रकारचे जोक्स शेअर करत आहेत. यादरम्यान आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजप आमदार विक्रम सैनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी काश्मीरी गोऱ्या मुलींच्या लग्नावर विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री रिचा चड्ढा चांगलीच संतापली आहे आणि तिने ट्विटरवर त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. 

भाजप आमदार विक्रम सैनी यांचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुजफ्फरनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील आहेत. या व्हिडिओत ते काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हणाले की, 'देशातील मुस्लिमांनी खुश व्हायला हवे. ते आता न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींशी लग्न करू शकतात. इतकंच नाही तर भाजपचे अविवाहित नेतेही आता काश्मीरला जमीन खरेदी करू शकतात आणि लग्न करू शकतात.' 

विक्रम सैनी यांच्या या विधानामुळे बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाचा संताप अनावर झाला आहे आणि तिने त्यांना सोशल मीडियावर टीका केली आहे. रिचाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात डायनोसॉर दिसत आहे.

यासोबत तिने ट्विट केलं की, रेसिस्ट, सेक्सिस्ट, कामुक डायनोसॉर अद्याप नष्ट झालेले नाही, याउलट ते वाढत आहेत. यासाठी जायचं होतं काश्मीरला? लग्न तर कायदेशीरच होते? रिचाने या ट्विटसोबत एक ट्विटही जोडलं आहे. 

टॅग्स :रिचा चड्डाकलम 370भाजपा