'मुंज्या'च्या निमित्ताने कोकणातील एका अनोख्या भूताची ओळख करून देणाऱ्या मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने या चित्रपटात वेताळांच्या विश्वाची सफर घडवली आहे. त्यात एक प्रेमकथा गुंफत रहस्य वाढवले आहे. दंतकथा आणि लोककथेची सांगड घालून बनवलेल्या या चित्रपटातील नव्या कोऱ्या जोडीचे आकर्षण महत्त्वाचे ठरणारे आहे.कथानक : आलोक गोयल नावाच्या पत्रकाराची ही गोष्ट आहे. अॅडव्हेन्चर म्हणून तो जंगलात व्हिडिओ शूट करायला जातो आणि तिथे अस्वल त्याच्यावर हल्ला करते. ते पाहून त्याचे सहकारी पळून जातात, पण ताडका नावाची तरुणी अचानक तिथे येऊन आलोकला वाचवते. ती त्याला वेताळांच्या विश्वात नेते. तिथे यक्षासन म्हणजेच थामाा मानवी रक्तासाठी तहानलेला असतो, पण वेताळांच्या नियमानुसार तो तसे करू शकत नसल्याने कैदेत असतो. तारीका आलोकला घेऊन तिथून पळ काढते. त्यानंतर काय होते ते चित्रपटात आहे.लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची संकल्पना खूप वेगळी आहे. वेताळ आणि मानवाचे प्रेम हा प्लॉट घेऊन एका अशा विश्वाची पटकथा गुंफण्यात आली आहे, जे आजवर कल्पना किंवा गोष्टींच्या पलिकडले गेलेले नाही. पहिल्या भागात वेताळांच्या जगाची ओळख आणि प्रेमकथेची सुरुवात आहे. दुसऱ्या भागातील ट्विस्ट उत्कंठा वाढविणारा आहे. या भागात थामावर लक्ष केंद्रित करण्यात आले असले तरी कमकुवतपणा जाणवतो. बऱ्याच दृश्यांमध्ये सातत्याचा अभाव आहे. भेडीयाची एन्ट्री, एक्झीट आणि त्याचा येण्याचा हेतू नीट पटवून देत 'भेडीया २'मध्ये आयुष्मानची एन्ट्री पक्की केली आहे. 'रहे ना रहे...' या गाण्यासह व्हीएफक्सही चांगले आहेत. कॉमेडीचा तडका आणखी हवा होता.
Thamma Movie Review: वेताळविश्वातील प्रेमकथा; कसा आहे आयुषमान-रश्मिकाचा 'थामा' सिनेमा?
By संजय घावरे | Updated: October 22, 2025 12:32 IST