Join us  

CID च्या स्टारकास्टचं रियुनियन, सीझन 2 ची दिली हिंट; फ्रेडीच्या आठवणीत चाहते भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:13 AM

CID 2 चं शूटिंग लवकरच सुरु होणार.

टीव्हीवरील लोकप्रिय शो सीआयडी(CID) चे तब्बल 26 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने सीआयडीची संपूर्ण स्टारकास्टचं रियूनियन झालं. नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये एसीपी प्रद्युम्न म्हणजेच अभिनेते शिवाजी साटम यांनी सीआयडी 2 ची हिंट दिली. अलाना सैयद, अजय नागरथ, जानवी छेडा, श्रद्धा मुसले आणि हृषिकेश पांडे यांनी एकत्रित व्हिडिओ कॉल केला. यामध्ये त्यांचे चाहतेही सहभागी झाले.

अलानाने इन्स़्टाग्रामवर व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला. तिने लिहिले, "हे त्या लोकांसाठी आहे ज्यांनी पॉडकास्ट मिस केला. आम्ही सगळेच शूटिंगवर परत येण्याची वाट बघत आहोत. ही टीम एका कुटुंबाप्रमाणेच आहे. मिस यू फ्रेडी सर." या पोस्टवर जान्हवीने कमेंट करत लिहिले, "जेव्हा तुम्ही मला दुपारच्या डुलकीतून जागं करता तेव्हा तुम्हाला हेच दिसतं."

नेटकऱ्यांनी सीआयडीच्या रियूनियन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले,'कृपया परत एकत्र या. आम्ही सगळेच सीआयडी मिस करतो'.  अलानाने चाहत्यांना सीआयडीच्या शूटिंगदरम्यानचे मजेशीर किस्से सांगितले. तसंच एक बीटीएस व्हिडिओही शेअर केला. 

चाहत्यांना आली फ्रेडीची आठवण

चाहत्यांनी कमेंट्समध्ये दिनेश फडनीस म्हणजेच फ्रेडीची आठवण काढली. स्टारकास्टही त्यांच्या आठवणीत भावूक झाली होती. 5 डिसेंबर 2023 रोजी वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेते दिनेश फडनीस यांचं निधन झालं.  

टॅग्स :सीआयडीटिव्ही कलाकारशिवाजी साटम