Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑनस्क्रीन मायलेकींनी फॉलो केला ट्रेंड, रेश्मा शिंदेचा भन्नाट डान्स व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 14:56 IST

रणदिवेंच्या जान्हवीचा लेक ओवीसह डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

'घरोघरी मातीच्या चुली' ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आहे. अवघ्या काही दिवसांतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील रणदिवे  कुटुंब चाहत्यांना आपलंसं वाटतं. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. रेश्मा या मालिकेत रणदिवे कुटुंबातील थोरली सून जान्हवी रणदिवे ही भूमिका साकारत आहे. रेश्मा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते. अनेकदा रेश्मा तिचे रील व्हिडिओही शेअर करत असते. आता रेश्माने तिच्या ऑनस्क्रीन लेकीबरोबर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी आणि ओवी भन्नाट डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. जान्हवी आणि ओवीने इन्स्टाग्राम ट्रेंड फॉलो करत रील बनवला आहे. ऑनस्क्रीन मायलेकींचा हा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

रेश्माचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत बालकलाकार आरोही सांबरे ओवीच्या भूमिकेत आहे. याआधी तिने 'शुभविवाह', 'मुलगी झाली हो', 'नवं गडी नवं राज्य' या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

दरम्यान, रेश्मा शिंदेनेही याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. रेश्माने 'लगोरी', 'चाहूल', 'नांदा सौख्य भरे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. काही मराठी सिनेमांमध्येही ती झळकली आहे.

टॅग्स :रेश्मा शिंदेटिव्ही कलाकार