Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन दीर-जाऊबाईबरोबर 'लो चली मै' गाण्यावर डान्स; रणदिवेंच्या सुनबाईंचा व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 13:24 IST

रेश्माने ऑनस्क्रीन जाऊबाई आणि दीर यांच्याबरोबर 'लो चली मै' या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

'घरोघरी मातीच्या चुली' या छोट्या पडद्यावरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. स्टार प्रवाहवरील या मालिकेतील रणदिवे कुटुंबही प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. या मालिकेत सध्या रणदिवे कुटुंबातील धाकटा लेक सारंगची लगीनघाई सुरू आहे. सारंग आणि ऐश्वर्या नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. घरोघरी मातीच्या चुली मालिकेत रेश्मा शिंदे, आशुतोष पत्की, सुमीत पुसावळे हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहे. 

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत जानकीच्या भूमिकेत आहे. रणदिवे कुटुंबातील थोरल्या सुनबाईची भूमिका ती साकारत आहे. रेश्मा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती शेअर करते. रेश्माने ऑनस्क्रीन जाऊबाई आणि दीर यांच्याबरोबर लो चली मै या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. 

या व्हिडिओत रेश्मा सारंग आणि ऐश्वर्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. हा भन्नाट डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रणदिवेंच्या सुनबाईचा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत ती म्हणते, "प्रत्येक मोठया जावेला या गाण्यावर एकदातरी थिरकवास वाटल असेलच...तुम्हाला काय वाटतं??". तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. ऐश्वर्याचा सौमित्रबरोबर लग्न करण्याचा डाव फसल्यानंतर आता ती पुढे काय खेळी करणार? हे पाहणं रोमांचक असणार आहे. या मालिकेत प्रतिक्षा मुंगेकर ऐश्वर्या हे पात्र साकारत आहे. तर उदय नेने सारंगच्या भूमिकेत आहे.  

टॅग्स :रेश्मा शिंदेटिव्ही कलाकारस्टार प्रवाह