Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी दिग्दर्शकाच्या पत्नी होत्या रेणुका शहाणे, घटस्फोटानंतर वाटायचं 'लग्न म्हणजे जुगार पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:32 IST

रेणूका शहाणे यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले पती मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत हे फारच कमी जणांना माहित आहे.

Renuka Shahane : 'हम आपके है कौन' सिनेमातील 'लाडकी भाभी' म्हणजेच मराठमोळ्या रेणुका शहाणे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत यश मिळवलं आहे. त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचे, अभिनयाचे, गोड हास्याचे अनेक जण चाहते आहेत. याउलट त्यांचे पती आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी कायमच खलनायकाच्या भूमिका जास्त केल्या आहेत. त्यामुळे या दोघांचे लग्न झाल्यावर तर अनेकांना आश्चर्यच वाटले होते. दोघांच्याही लग्नाला तब्बल २२ वर्ष झाली आहेत. मात्र रेणूका शहाणे यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले पती मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत हे फारच कमी जणांना माहित आहे.आशुतोष यांच्याशी लग्न करण्याअगोदर त्यांचा आधीच एक घटस्फोट झाला होता. मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे (Vijay Kenkre) यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. विजय केंकरे यांना रेणुका यांनी मराठीतच काम करावं असं वाटत होतं. यामुळेच दोघांमध्ये काही मतभेद झाले. यानंतर दोघांनी आपसी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न केल्यानंतर ही जोडी कशी काय जमली असाच प्रश्न सर्वांना पडला होता. त्यांना एका मुलाखतीत सांगितले, 'माझे आशुतोषबरोबर लग्न टिकणार नाही असं त्यांना जवळचे लोक, नातेवाईक म्हणाले होते. कारण रेणुका या महाराष्ट्रीयन आहेत तर आशुतोष हे मध्य प्रदेशमधील एका गावातील रहिवासी आहेत. दोघांची संस्कृतीच वेगळी आहे त्यामुळे रेणुका यांना जमवून घेता येईल का अशी भीती त्यांच्या घरच्यांना होती.

रेणुका आणि आशुतोष यांच्या लग्नाला २२ वर्ष झाली आहेत आणि दोघेही आजही एकमेकांच्या तितकेच प्रेमात आहेत. लग्न हे जुगार आहे असे रेणुका यांना वाटत होते. मात्र ते दोघे नवरा बायको ऐवजी चांगले मित्र झाले. मित्र नेहमीच चांगले भागीदार नसतात असं आशुतोष म्हणतात. 

टॅग्स :रेणुका शहाणेआशुतोष राणामराठी अभिनेतालग्न