Join us
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र ते विनोद मेहरा! बिग बींव्यतिरिक्त 'या' दिग्गज कलाकारांना रेखाने केलंय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 14:43 IST

Rekha: बिग बीं व्यतिरिक्त रेखा बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्यांच्याही प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे हे अभिनेता कोणते ते पाहुयात.

अभिनयासह सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या नजरा कायम आपल्यावर खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). आजवरच्या कारकिर्दीत रेखाच्या चित्रपटांसह तिच्या सौंदर्याची आणि पर्सनल लाइफची प्रचंड चर्चा रंगली. आजही अनेक जण तिच्या प्रेमात वेडे आहेत. म्हणूनच, ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं प्रेमप्रकरण तर जगजाहीर आहे. मात्र, बिग बीं व्यतिरिक्त रेखा बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्यांच्याही प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे हे अभिनेता कोणते ते पाहुयात.

नवीन निश्चल- 

'सावन भादो' या चित्रपटातून रेखाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता नवीन निश्चलने स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या काळात दोघांमधील जवळीकता वाढली होती. त्यामुळे त्यांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही.

जितेंद्र-

रेखा डेट करत असलेल्या कलाकारांच्या यादीत जितेंद्रचंही नाव होतं. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली.  त्या काळात रेखाला जितेंद्र प्रचंड आवडत होते. मात्र, जितेंद्र यांचं शोभा कपूरसोबत लग्न झालं होतं. त्यामुळे रेखा-जितेंद्र यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 

अमिताभ बच्चन -

रेखा आणि अमिताभ यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. दोघांचंही एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर रेखा आजही अमिताभच्या नावाने सिंदूर लावते असं सांगण्यात येतं. मात्र, बिग बींचं जया बच्चन यांच्यासोबत लग्न झाल्यामुळे आपला संसार वाचवण्यासाठी त्यांनी रेखापासून फारकत घेतल्याचं सांगण्यात येतं.

विनोद मेहरा -

८० च्या दशकात विनोद मेहरा आणि रेखा यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. परंतु, विनोद यांच्या आईला रेखा अजिबात पसंत नव्हती. त्यामुळे रेखा किंवा आई या दोघांपैकी एका व्यक्तीची निवड करण्याची अट त्यांनी विनोद यांच्यापुढे ठेवली. अखेर विनोद यांनी त्यांच्या आईची निवड केली.

मुकेश अग्रवाल -

अनेकदा प्रेमात अपयश मिळालेल्या रेखाने मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं. मात्र, लग्नाच्या काही दिवसांमध्येच त्यांच्यात वाद सुरु झाले. परिणामी, नैराश्यात गेलेल्या मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चनजितेंद्रविनोद मेहराबॉलिवूडसिनेमा