Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीचा पहिलाच सिनेमा हीट ठरल्यामुळे रवीना टंडन साई दरबारी, मनोभावे घेतलं दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:13 IST

रवीनाने साई समाधीचे मनोभावे दर्शन घेत विधीवत पूजाही केली.

Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडन ही नुकतंच बुधवारी शिर्डीत पोहचली. लेक राशा थडानीच्या 'आझाद' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताच अभिनेत्रीनं साई बाबा मंदिरात दर्शन घेतलं. रवीनाने साई समाधीचे मनोभावे दर्शन घेत विधीवत पूजाही केली. यावेळी ती पारंपारिक पोषाखात दिसली. रवीनाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

रवीना ही साईबाबांचे निस्सीम भक्त आहे. आपल्या कुटुंबांसोबत ती कायम साईदरबारी हजेरी लावत असते. आयएएनएसशी बोलताना रवीना म्हणाली, "माझे वडील ५० वर्षांपासून येथे येत होते. मी जन्मल्यापासून नियमितपणे येथे येत आहे. माझी मुलांनाही मी प्रथम येथे आणले आणि बाबांच्या चरणी ठेवले होते. साई मंदिरात आल्यावर मला माझे वडील हे माझ्यासोबत साईबांबासमोर हात जोडून उभे असल्याचा भास होतो…दोघांचेही आशिर्वाद मला येथे आल्यानंतर मिळतात". 

पुढे ती म्हणाली, "साई बाबांचा मला कायम आशिर्वाद मिळतो. पण, मी त्यांच्याकडे कधीच काही मागत नाही. आपल्या त्यांनी जीवन दिलंय. हात पाय दिलेत. त्यामुळे मेहनत करुन कर्म कमवायचे आहेत आणि कर्मानं फळ मिळतं. मी आभार मानन्यासाठी साई दरबारी येते". राशाबद्दल  रवीना म्हणाली, "आझाद सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. याचा आनंद आहे मात्र सध्याचा काळ नवोदीत कलाकारांसाठी संघर्षाचा आहे. राशाला साईबाबांनी सांभाळून घेतल्यानं तिचं फार कौतुक होतय. साईबाबा आम्हाला सांभाळून घेतात".

दरम्यान, अलिकडेच रवीनाची लेक राशाचा 'आझाद' सिनेमा प्रदर्शित झाला. हा तिचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे तो रवीनासाठी खास आहे. सिनेमातील राशाचं आयटम साँग प्रचंड हीट झालं आहे.  राशाचं नृत्य आणि अभिनयाचं देखील सिनेमा प्रेमींकडून कौतूक होतय. लेकीचा पहिलाच सिनेमा हीट झाल्यानं रवीना प्रचंड आनंदी आहे.  'आझाद' सिनेमात राशासोबत अजय देवगणसह त्याचा पुतण्या अमन देवगणची देखील भुमिका आहे. 17 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून सिनेमाने चांगली कमाई केलीय.

टॅग्स :रवीना टंडनसेलिब्रिटीबॉलिवूडशिर्डी