Join us

रवीना टंडन-करिश्मा कपूरचं विमानतळावर भांडण ? कॅटफाइटवर अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 14:34 IST

अभिनेत्रींमध्ये जोरदार कॅटफाईट पाहायला मिळते.

आज प्रत्येक क्षेत्रात जोरदार रस्सीखेच, स्पर्धा पाहायला मिळते. पुढे जाण्याची चढाओढ ही प्रत्येक क्षेत्रात असते; मग त्याला मनोरंजन जगतसुद्धा अपवाद कसं बरं राहील? इथं तर उलट सर्वाधिक स्पर्धा पाहायला मिळते. पेज-थ्री दुनियेच्या शब्दांत सांगायचं झालं तर अभिनेत्रींमध्ये जोरदार कॅटफाईट पाहायला मिळते. रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींमधली कॅटफाईट तर जगजाहीर आहे. यामधीलच एक नाव म्हणजे रवीना टंडन (Raveena Tandon) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor).  ९० च्या दशकात या दोन अभिनेत्रींमध्ये एवढा वाद होता की, त्यांना एकमेकांचे तोंडही बघायचे नव्हते.

रवीना टंडन आणि करिश्मा यांच्यात भांडण असल्याच्या अनेक चर्चा होत्या. यातच आता इतक्या वर्षानंतर एका मुलाखतीत रवीना टंडनने यावर भाष्य केलं आहे.  रवीनाने 'फिल्मफेअर'शी बोलताना रवीना म्हणाली, "माझी अजूनही पूजा भट्ट, जुही चावला, माधुरी दीक्षित आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी मैत्री आहे. माझ्यात आणि करिश्मामध्ये कॅटफाईट झाली नाही. ते फक्त मसालेदार गॉसिप म्हणून सादर केले गेले. त्याकाळी सोशल मीडिया अशी कोणतीही गोष्ट नव्हती, जिथे तुम्ही तुमचे मत मांडू शकता". 

रवीना सांगितले की, "नायकांमध्ये भांडणेही व्हायची, पण हिरोइन्समधील भांडण केवळ शाब्दिक चकमकीपुरतीच मर्यादित होती. हिरोइन्समध्ये कॅटफाईट व्हायच्या असे नेहमी का म्हटले जाते? हा त्यांच्यातल्या केमिस्ट्रीचा विषय आहे, जो आजही दिसून येतो. पण असे काही आहेत, जे तेव्हा असुरक्षित वाटून घ्यायचे आणि आताही असुरक्षित वाटून घेतात. ते नाती टिकवण्यास सक्षम नसतात".

करिश्माबद्दल बोलताना रवीना म्हणाली, 'आम्ही अजूनही भेटतो, बोलतो. त्यामुळे साहजिकच आमची कधीच कॅटफाईट झाली नाही. तर 'आतिश'च्या शूटिंगदरम्यान एअरपोर्टवर झालेल्या मारामारीबद्दल रवीना टंडनला विचारले असता ती म्हणाली, 'कधीही कॅटफाईट झाली नाही. आपापसात चर्चा होऊ शकते, मतभेद असू शकतात. त्यावेळी काही लोकांनी अतिशयोक्ती केली होती. मिरची आणि मसाला लावून काही गोष्टी पसरवल्या होत्या'. दरम्यान, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर 'आतिश' चित्रपटात एकत्र काम करत होत्या. या सिनेमाच्यावेळी दोघींमध्ये मोठं भांडण झाल्याच्या चर्चा होत्या. 

टॅग्स :रवीना टंडनकरिश्मा कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड