Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं, निक्कीवर हात उगारल्याने मिळाली मोठी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 21:52 IST

निक्की तांबोळीवर हात उगारल्याने आर्या जाधवचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे (bigg boss marathi 5, aarya jadhav)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज भाऊचा धक्का सुरु आहे. या धक्क्यावरुन मोठी बातमी समोर येतेय ती म्हणजे आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलंय. टास्कदरम्यान निक्कीवर हात उगारल्याने आर्याला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखसमोर ही मोठी शिक्षा सुनावण्यात आलीय. आर्याला बिग बॉसने तत्काळ निष्कासीत केलंय. आर्याचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला आहे. कोणालाच तिचा निरोप घेता आला नाही. मुख्य दरवाजातून आर्या घराबाहेर गेलीय.

आर्या जाधवचा बिग बॉसमधील प्रवास संपला

आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आर्या जाधवला सुरुवातीला जेलमधून बाहेर काढलं. नंतर रितेशने आर्याला तिची बाजू मांडायला सांगितली. आर्याने तिची बाजू मांडली आणि निक्कीची माफीही मागितली. पुढे रितेशने आर्याच्या कृत्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. नंतर निक्कीने तिची बाजू मांडली. शेवटी बिग बॉसने आदेश देऊन आर्याला बिग बॉसमराठीमधून बाहेर काढलं. आर्या तडकाफडकी घराबाहेर गेल्याने कोणालाच तिचा निरोप घेता आला नाही.

आर्या आणि निक्कीमध्ये काय घडलं होतं?

'बिग बॉस मराठी'च्या घरात गुरुवारी कॅप्टन्ससीचा टास्क पार पडला. या टास्कदरम्यान आर्या व  निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कोणावर हात उगारायला बंदी आहे. बिग बॉसदेखील याचा निषेध करतात. कॅप्टन्सीवरुन आर्या आणि निक्कीची जोरदार जुंपली आहे. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले. अखेर अंतिमतः आज आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं. त्यामुळे आर्याचा प्रवास संपला आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनरितेश देशमुख