Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जास्त वेळ शूटिंग करायला काय हरकत आहे!"; कामाच्या शिफ्टवरुन रणवीर सिंगचं विधान चर्चेत, काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:04 IST

'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणने ८ तासांच्या शिफ्टवरुन तिचं मत व्यक्त केलं होतं. यावर रणवीरने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या कामाच्या '८ तासांच्या शिफ्ट'च्या मागणीमुळे चर्चेत आहे. या मागणीमुळे तिला 'स्पिरिट' आणि 'कल्कि 2898 AD पार्ट 2' सारख्या मोठ्या चित्रपटांतून काढण्यात आलं. या पार्श्वभूमीवर, आता दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात रणवीरने जास्त वेळ काम करण्याच्या शिफ्टला पाठिंबा दिला होता.

नेमकं काय म्हणालेला रणवीर?

हा व्हायरल व्हिडिओ २०२२ मधील आहे, जेव्हा रणवीर सिंगने 'बॉलिवूड हंगामा'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रणवीरने जास्त काम करण्याच्या तासांवर आपले मत व्यक्त केले होते. रणवीर म्हणाला होता, "अनेकदा लोक मला म्हणतात की, मी सगळ्यांना बिघडवत आहे. सगळे म्हणतात, ८ तासांच्या शिफ्टमध्ये मी कधी कधी १०-१२ तास शूटिंग करतो. माझ्यामुळे इतर कलाकारांनाही तसंच करावं लागतं. पण, आता ८ तासांमध्ये हवी असलेली गोष्ट तयार होत नसेल, तर ठीक आहे ना. थोडी जास्त वेळ शूटिंग करायला काय हरकत आहे."

रणवीरच्या या जुन्या विधानाचा व्हिडिओ आता रेडिटवर व्हायरल होत आहे. एकूणच कामाच्या शिफ्टच्या बाबतीत रणवीर आणि दीपिकाचे दोन वेगळे दृष्टीकोन आहेत, हे चाहत्यांना स्पष्ट झालं आहे.

'धुरंधर'साठी १६-१८ तास शूटिंग

रणवीर सिंग सध्या त्याच्या 'धुरंधर' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, दिग्दर्शक आदित्य धर यांनी खुलासा केला होता की, 'धुरंधर'च्या यशासाठी कलाकार आणि चित्रपटाच्या इतर क्रूने खूप मेहनत घेतली. चित्रपट चांगला बनावा म्हणून गेली दीड वर्ष अनेकवेळा कलाकारांना १६ ते १८ तास शूटिंग करावी लागली होती. १९ मार्च २०२६ ला 'धुरंधर'चा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh supports longer shifts, contrasting Deepika's 8-hour demand.

Web Summary : Amid Deepika Padukone's 8-hour shift demand controversy, an old video of Ranveer Singh supporting longer working hours resurfaced. He stated that exceeding 8 hours is acceptable if needed to achieve desired results. This highlights differing views on work shifts between the couple.
टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणबॉलिवूड