Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अक्षय खन्नाने फार अप्रतिम केलंय, पण..."; 'रणपति शिवराय' सिनेमात औरंगजेब साकारणारे समीर धर्माधिकारी काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:26 IST

एका मुलाखतीत समीर धर्माधिकारी यांनी 'छावा' सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेवर टिप्पणी करुन त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहे.

'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर अभिनेते समीर धर्माधिकारी यांनी औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत समीर धर्माधिकारी यांनी 'छावा' सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेवर टिप्पणी करुन त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहे.तारांगणला दिलेल्या मुलाखतीत समीर धर्माधिकारी म्हणाले, ''अक्षय खन्नाने फार अप्रतिम केलं. पण नशिबाची गोष्ट अशी की, त्याने ८० वर्षांचा केलाय मी पन्नाशीचा करतोय. त्यामुळे मी प्रीक्वलमध्ये आहे. जर मला ८० वर्षांचा सांगितला असता तर, दिग्पालला विनंती केली असती की, तू दुसऱ्या कोणत्यातरी कलाकाराला घे. अजूनही मला विचारतात. पण तो जो औरंगजेब आहे, तो शंभू महाराजांच्या काळातले आहेत आणि मी साकारले आहेत ते ५० वर्षांचे आहेत. महाराज त्यावेळी ३६ वर्षांचे होते. औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस, त्यासाठी राजांना आमंत्रण गेलं. राजेही आले.''

अशाप्रकारे समीर धर्माधिकारींनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाबद्दल सांगायचं तर, मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sameer Dharmadhikari on Akshay Khanna's Aurangzeb in 'Chhava' and his role.

Web Summary : Sameer Dharmadhikari, playing Aurangzeb in 'Ranpati Shivray', praised Akshay Khanna's portrayal in 'Chhava'. He clarified his Aurangzeb is younger, focusing on the king's 50th birthday event.
टॅग्स :समीर धर्माधिकारीअक्षय खन्ना'छावा' चित्रपटबॉलिवूडमराठी अभिनेतामराठी चित्रपट