Join us

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये रणबीर कपूरची एन्ट्री? 'या' फोटोंनी लक्ष वेधले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 20:42 IST

रणबीर कपुरच्या पोलीस अवतारातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

Ranbir Kapoor Rohit Shetty : दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी 'सिंगम अगेन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अजय देवगणसह अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त रोहित शेट्टीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला घेऊन पोलिसांवर आधारित एक वेब सीरिजदेखील बनवली आहे. आता या कॉप युनिव्हर्समध्ये अभिनेता रणबीर कपुरची एन्ट्री होऊ शकते.

अलीकडेच रणबीर कपुरचा 'अॅनिमल' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सूमारे 900 कोटींची कमाई करुन धुमाकूळ घातला. या चित्रपटातून रणबीरने दमदार कमबॅक केले आहे. आता रणबीर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर रोहित शेट्टी आणि रणबीर कपुरचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात रणबीर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. 

चित्रपट की जाहिरात?दरम्यान, रोहित आणि रणबीर एका जाहिरातीसाठी एकत्र आले असून, हे फोटोदेखील त्या जाहिरातीचे असल्याचे बोलले जात आहे. फोटोंमध्ये रणबीर एकदम दमदार लुकमध्ये दिसत आहे. फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, चाहते या दोघांना एकत्र चित्रपट करण्याची मागणी करत आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूररोहित शेट्टीबॉलिवूडपोलिस