Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील 'कंगन रुबी' हे नवं गाणं रिलीज, सोशल मीडियावर आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 18:24 IST

अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' सिनेमातील दुसरं गाणं 'कंगन रुबी' हे रिलीज झालंय. हा सिनेमाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Raksha Bandhan Second Song Release: अक्षय कुमार (Akshay Kumar)चा 'रक्षा बंधन'(Raksha Bandhan)हा चित्रपट चर्चेत आहे. हा सिनेमाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेते या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत शेअर करत असतात. त्याचवेळी या चित्रपटाचे दुसरे गाणे 'कंगन रुबी' रिलीज झाले आहे.

या गाण्यात खिलाडी कुमार भूमी पेडणेकरसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये भूमी खूपच सुंदर दिसत आहे. गाण्यात, भूमीने सोनेरी आणि गुलाबी रंगाचा शिमरी ड्रेस घातला आहे, काही वेळापूर्वी रिलीज झालेले हे गाणे एक पार्टी साँग आहे, ज्यावर आतापर्यंत 66,686 व्ह्यूज आले आहेत. याशिवाय या गाण्याला चाहत्यांनी 10 हजारांहून अधिक लाईक्स दिले आहेत.

रक्षाबंधन हा चित्रपट आनंद एल राय दिग्दर्शित करत आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत सहजीन कौर, दीपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत देखील दिसणार आहेत, ज्या अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमार सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अक्षय कुमार 'राम सेतू'मध्येही दिसणार आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा देखील दिसणार आहेत. या दोन चित्रपटांशिवाय अक्षय कुमार इमरान हाश्मीसोबत सेल्फी या चित्रपटातही दिसणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसेलिब्रिटी