Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात है! मराठीतल्या सेलिब्रिटी जोडीच्या मिसळ स्टॉलला राज ठाकरेंची भेट, दिल्या खास शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 10:12 IST

मिसळ महोत्सवात स्वाती आणि तुषारने आपला स्टॉल उभा केला आहे.

प्रत्येक लहान मोठ्या शहरात मिसळ पाव मोठ्या चवीने खाल्ली जाते. मोठमोठे रेस्टॉरंट असो की छोटेखानी फूड स्टॉल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिसळ पाव सहज उपलब्ध होते. मुंबईत हल्ली अनेक ठिकाणी मिसळ महोत्सव होऊ लागलेत. त्याला होणारी गर्दी पाहता, मुंबईकरांचं मिसळप्रेम सहज लक्षात येऊ शकतं. मिसळची आपली स्पेशल डिश घेऊन मुंबईकरांच्या सेवेतह अभिनेत्री स्वाती देवल आणि 'चला हवा येऊ द्या' या शोचा संगीत दिग्दर्श तुषार देवल ही  सेलिब्रिटी जोडी रुजू झाली.

मिसळ महोत्सवात स्वाती आणि तुषारने आपला स्टॉल उभा केला आहे. हा मिसळ महोत्सव सध्या बोरिवलीतील अभिनव नगर येथे सुरू आहे. मिसळ खाणाऱ्या मुंबईकर खवय्यांना त्यांची मिसळ भलतीच पसंत पडलीय. तुषारने या स्टॉलचे नाव  'चला मिसळ खाऊया' असे ठेवले आहे. मिसळ महोत्सवाला राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली. त्यांनी तुषारच्या स्टॉलला भेट देत खास शुभेच्छा देखील दिल्या. 

तुषार देवलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे यांनी मिसळ स्टॉल भेट दिल्याचं दिसून येत आहे. तुषारनं कॅप्शनमध्ये लिहलं,  'पहिल्यांदाच राज साहेबाना एवढ्या जवळून बघितलं... त्यांना आमच्या मिसळी विषयी सांगितलं .. आणि त्यांनी खांद्यावर हात ठेऊन शुभेच्छा दिल्या ..... बस्स....... अजून काय पाहिजे..... एवढ्या गर्दीत 2 शब्द ऐकून घेतल्या बद्दल राज साहेब मनापासून धन्यवाद'. 

तुषार आणि स्वातीच्या या मिसळ स्टॉलचे फोटो सध्या त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या स्टॉलवर  लज्जतदार मिसळ व उकडीचे मोदकही मिळत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन स्वाती घराघरात पोहचली. तर, तुषार देवल 'चला हवा येऊ द्या या' शोच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मराठीतली ही सेलिब्रिटी जोडी कलाविश्वासह सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे ते अनेकदा त्यांचे मजेशीर रिल्स, व्हिडीओ शेअर  करत असतात. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजनराज ठाकरे