इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती देशांमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आपल्या कुटुंबासह दुबईत अडकल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. यामुळे त्याचे चाहते प्रचंड काळजीत पडले होते. मात्र, आता स्वतः माधवनने या सर्व अफवांना पूर्णविराम देत चाहत्यांना महत्वाची अपडेट दिली आहे.आर. माधवन हा आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवण्यासाठी दुबईत असल्याचे समजताच, या युद्धादरम्यान तो तिथे अडकला तर नाही ना? अशी भीती सोशल मीडियावर व्यक्त केली जाऊ लागली. पण या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर माधवन म्हणाला त्यानुसार, तो सध्या दुबईत नसून US मध्ये आहे. तो पूर्णपणे सुरक्षित असून काळजी घेणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत. जोवर युद्धजन्य परिस्थिती सुरळित होत नाही, तोवर तो अमेरिकेतच राहणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. माधवनने स्वतःच सांगितल्याने चाहत्यांनी सुटकेच श्वास सोडला आहे.माधवन जरी सुरक्षित असला तरीही सोनल चौहान, नर्गिस फाखरीसारखे काही बॉलिवूड अभिनेते आणि आंतरराष्ट्रीय कलाकार या युद्धाच्या वातावरणात अडकले असल्याचं समजतंय. या कलाकारांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. हे कलाकारही लवकरात लवकर भारतात आणि त्यांच्या मायदेशात परततील, अशी चाहत्यांना आशा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांच्या संपर्कात आहेत.
Web Summary : Amidst Iran-Israel tensions, rumors spread that R. Madhavan was stuck in Dubai. He clarified he's safe in the US, not Dubai. Other Bollywood actors are reportedly caught in the conflict zone. Fans express concern and hope for their safe return.
Web Summary : ईरान-इजरायल तनाव के बीच अफवाह उड़ी कि आर. माधवन दुबई में फंस गए। उन्होंने स्पष्ट किया कि वे यूएस में सुरक्षित हैं, दुबई में नहीं। कुछ अन्य बॉलीवुड कलाकार कथित तौर पर संघर्ष क्षेत्र में फंसे हुए हैं। प्रशंसक चिंता व्यक्त करते हैं और उनकी सुरक्षित वापसी की उम्मीद करते हैं।