Join us
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह की अरेंज? हार्दीक जोशीची 'प्यारवाली लव्हस्टोरी', ६ महिन्यांनी आला होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 14:13 IST

सहा महिन्यांनी तिचा होकार आला...

हार्दिक जोशी, अभिनेता

मुंबई - प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांचीच असते. पण, कुणाचं प्रेम हे लग्नाअगोदर सुरू झालेलं असतं. तर कुणाचं प्रेम हे लग्नानंतर सुरू होतं. लग्नाअगोदरच्या प्रेमाला लव्हमॅरेज असं म्हणतात. प्रेमप्रकरणातून न झालेल्या किंवा कुटुंबीयांनी पै पाहुण्यांच्या मर्जीतून जमवलेल्या लग्नाला अरेंज मॅरेज असं म्हणतात. मात्र, दोन्ही लग्नामध्ये प्रेम हा धागा कॉमन राहतो. प्रेम हे राजकारण्यांनाही होऊ शकतं. राजकारण्यांचीही प्यारवाली लव्ह स्टोरी असू शकते. त्याचप्रमाणे कलाकारांचीही प्रेमळ गोष्ट असते. मराठमोळा अभिनेता हार्दीक जोशी याने सांगितलीय त्याची प्यारवाली लव्ह स्टोरी. 

अक्षया ही मुळात माझी चांगली मैत्रीण आहे. मालिकेच्या निमित्तानं अक्षया आणि मी पाच वर्षे एकत्र होतो. आम्हा दोघांमध्ये प्रेमांकुर फुलवण्यासाठी लागणारा स्पार्क माझ्या आईनेच पेटवला. आईला ती आवडायची. त्यामुळे २०१७ मध्येच तिनेच अक्षयाला माझ्यासोबत लग्नाबाबत विचारलं होतं. हे मला नंतर कळलं. त्यावेळी अक्षयानेही खेळकर पद्धतीनं घेतलं होतं. मालिका संपल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने जवळ आलो. मी विचारल्यावर सहा महिन्यांनी अक्षयाचा होकार आला. तिच्याकडे खूप समजूतदारपणा आहे. खूप लहान वयात मॅच्युरिटी आहे. कदाचित माझ्यापेक्षाही जास्त... घर सांभाळणारी, कुटुंबाला प्राधान्य देणारी, करिअरचाही विचार करणारी आहे. मी कन्फ्युज असतो तेव्हा ती कन्फ्युजन दूर करते. पूर्णत: पॅाझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे. माझ्यातील माणूस तिला आवडतो. लग्न झाल्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या की, तुमचं लग्न व्हायला हवं, असं आम्हालाही वाटत होतं.  

टॅग्स :हार्दिक जोशीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टटेलिव्हिजनसिनेमा