अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2: The Rule) काल सर्वत्र रिलीज झाला. मुंबईतील बांद्रा येथील गेटी गॅलक्सी थिएटरमध्येही शो हाऊसफुल सुरु होता. दरम्यान मध्यंतरानंतर लोक पु्न्हा थिएटरमध्ये आले तेव्हा सर्वांना खोकला यायला लागला. एका अज्ञाताने थिएटरमध्ये विषारी गॅस फवारला होता. शो १५ मिनिटे थांबवण्यात आला. अनेक प्रेक्षकांनी तक्रारही केला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बांद्रा येथील गेटी गॅलक्सी थिएटरमध्ये नेहमीच सिनेप्रेमींची गर्दी असते. काल 'पुष्पा २' च्या निमित्ताने थिएटरमध्ये शो हाऊसफुल सुरु होता. मध्यंतर झाल्यानंतर लोक खाऊन पुन्हा थिएटरमध्ये आले. तेव्हा सगळ्यांनाच खोकला यायला लागला. कोणीतरी काहीतरी विषारी गॅस फवारल्याचं जाणवलं. तात्काळ पोलिसांना सूचना करण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली आणि नंतर एकेकाला बाहेर सोडण्यात आलं. १० ते १५ मिनिटं शो थांबवण्यात आला होता. एएनआयशी बोलताना प्रेक्षकांनी संपूर्ण घटना सांगितली.
'पुष्पा २' ची क्रेझ पाहता अनेक लोक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. काही ठिकाणी गोंधळ उडाल्याचंही चित्र दिसत आहे. त्यातच मुंबईतील थिएटरमध्ये असा प्रकार घडल्याने चांगलीच चर्चा झाली. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २'च्या प्रीमियरला हैदराबादमध्ये चेंगराचेंगरी झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला.
'पुष्पा 2'ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
बॉक्स ऑफिस रिपोर्टकडे नजर टाकल्यास 'पुष्पा 2'ने ओपनिंग डेला तब्बल १६५ कोटींची कमाई केली. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' सिनेमाने रिलीजच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून रात्री उशीर सिनेमाचे शो आयोजित केले होते. रात्री उशीरा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली आणि सिनेमाला १०.१ कोटींचा फायदा झाला. त्यामुळे ही कमाई पण जोडल्यास 'पुष्पा 2'ने पहिल्याच दिवशी तब्बल १७५ कोटींची कमाई केली.