Join us

"अभिनय १००, पण कथा...", अंकिता वालावलकरला नाही आवडला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २', म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:36 IST

Pushpa 2 : 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने देखील 'पुष्पा २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अंकिताने 'पुष्पा २'चा रिव्ह्यू दिला आहे.

Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेला 'पुष्पा २' नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते या सिनेमाच्या प्रतिक्षेत होते. 'पुष्पा'नंतर प्रेक्षकांना 'पुष्पा २'ची आतुरता होती. अखेर ५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांकडून 'पुष्पा २' सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरने देखील 'पुष्पा २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अंकिताने 'पुष्पा २'चा रिव्ह्यू दिला आहे. 

कोकण हार्टेड गर्लने 'पुष्पा २' बघितल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. प्रेक्षकांना भावणारा 'पुष्पा २' पाहून अंकिता मात्र नाराज झाली आहे. या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर करत तिने 'पुष्पा २' बघून पैसे वाया घालवू नका, असं म्हटलं आहे. "अभिनय १०० पैकी १००...पण, स्टोरी...पुष्पा पहिला भाग खूप सुंदर होता. कृपया तुमचे पैसे वाया घालवू नका. मनोरंजन हे एक प्रभावी माध्यम आहे आणि जे सिनेमे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात...त्यांना त्या पद्धतीने ट्रीटही केलं गेलं पाहिजे", असं अंकिताने म्हटलं आहे. 

दरम्यान, 'पुष्पा २' हा २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा 'चा सीक्वल आहे. रिलीजआधीच  'पुष्पा २' सिनेमाने अॅडव्हान्स बुकींगमधून मोठी कमाई केली होती. पहिल्याच दिवशी 'पुष्पा'ने  १६४ कोटी कमावले.तर दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींचा गल्ला जमवला. शनिवारी सिनेमाने ११५ कोटींचा बिझनेस केला. आतापर्यंत या सिनेमाने एकूण ३८३.७ कोटी  रुपये आहे. तर जगभरात 'पुष्पा'ने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. 

टॅग्स :पुष्पाअंकिता प्रभू वालावलकरअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना