Join us

Pushpa-The Rule : बाबो! ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले ‘इतके’ कोटी, आकडा वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 17:08 IST

Pushpa-The Rule, Pushpa 2 : पुष्पाचा दुसरा पार्ट Pushpa: The Rule येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या सिनेमाबद्दल आणखी एक अपडेट समोर आलं आहे.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) हा सिनेमा २०२१ चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचा डायलॉग 'झुकेगा नहीं' अद्यापही लोकांच्या ओठांवर आहे. याचमुळे पुष्पाचा दुसरा पार्ट Pushpa: The Rule येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ७ एप्रिलला या सिनेमाचा नवा टीझर रिलीज झाला होता. कालच या सिनेमातील अल्लूचा नवा लुक रिलीज करण्यात आला.  अल्लू सध्या या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता या सिनेमाबद्दल आणखी एक अपडेट समोर आलं आहे.

होय, या सिनेमासाठी अल्लूनं तगडी फी वसूल केली आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. होय, रिपोर्टनुसार, अल्लूने ‘पुष्पा २’साठी तब्बल ८५ कोटी घेतले आहेत. तेलगू इंडस्ट्रीत हा एक रेकॉर्ड आहे. अर्थात मानधनाचा हा आकडा किती खरा, किती खोटा याबद्दल आम्ही काहीही दावा करत नाही. अद्याप ‘पुष्पा २’ची रिलीज डेट समोर आलेली नाही. चर्चा खरी मानाल तर हा चित्रपट २०२३ च्या शेवटी किंवा २०१४ च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.

नव्याने शूट होणार सिनेमा?पहिल्या पार्टची कथा जिथे संपली, तिथून Pushpa 2: The Ruleची कथा सुरू होणार आहे. अर्थात हा सिनेमा कधी रिलीज होतोय, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. चर्चा खरी मानाल तर, आत्तापर्यंत शूट केलेल्या सीन्सबद्दल दिग्दर्शक सुकूमार समाधानी नाहीत. काही सीन्स रिशूट करण्याचा त्यांचा विचार आहे. असं झालं तर ‘पुष्पा 2’चं प्रदर्शन आणखी लांबणार आणि चाहत्यांची प्रतीक्षाही वाढणार.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाTollywood