Join us

बॉलिवूड अन् साऊथ गाजवणारी ही मराठमोळी अभिनेत्री आहे पुष्कर जोगची क्रश, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:49 IST

अभिनेत्री पुष्करच्या मेसेजला रिप्लायही देते असं तो म्हणाला.

अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) बिग बॉस मराठीच्या सीझन १ पासून प्रसिद्धीझोतात आला. पुष्कर अभिनयासोबतच निर्माता देखील आहे. त्याचे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षात रिलीज झाले आहेत. पुष्कर सोशल मीडियावर सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीत त्याच्या क्रशबद्दल सांगितलं. मराठमोळी अभिनेत्री जी बॉलिवूड आणि साऊथमध्ये प्रसिद्ध आहे ती पुष्करची क्रश आहे.

पुष्कर जोगने नुकतंच त्याच्या क्रशचा खुलासा केला. 'कलाकृती मीडिया'ला  दिलेल्या मुलाखतीत पुष्कर म्हणाला, "माझं एकीवर क्रश आहे. मला हे मान्य करावंच लागेल. मला मृणाल ठाकूर खूप आवडते. मी तिचा स्पॉटबॉयही बनेन इतकी ती मला आवडते. आजकाल ती मला मेसेजचे रिप्लायही देते. मला नक्कीच तिच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. तिच्याशी मैत्री करण्याची इच्छा आहे."

पुष्करने  २०१४ साली जास्मीन ब्रह्मभटसोबत लग्नगाठ बांधली. जास्मीन एअर हॉस्टेस आहे. त्यांना फेलिशा ही गोंडस मुलगी आहे. बिग बॉसच्या घरात असताना जास्मीन आणि फेलिशा पुष्करला भेटायला आले होते. तेव्हा बापलेकीच्या बाँडने सर्वांना भावुक केलं होतं. 

टॅग्स :पुष्कर जोगमृणाल ठाकूरबॉलिवूडमराठी अभिनेता