Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुलकित-क्रितीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, या तारखेला अडकणार विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 08:42 IST

बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी पुलकित सम्राट - क्रिती खरबंदा या दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आलीय

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा ही बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी. काहीच दिवसांपुर्वी या दोघांनी जवळचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत रोका सोहळा केला. दोघांच्या रोका सेरेमनीची चर्चा झाली. यानंतर दोघं लग्न कधी करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. या दोघांनी जरी गुपित ठेवलं असलं तरीही पुलकित - क्रितीच्या लग्नाची पत्रिकाच व्हायरल झाल्याने दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आलीय.

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लग्न करणार असल्याच्या बातम्या सुरु होत्या. तथापि, या जोडप्याच्या बाजूने कोणतेही अपडेट आले नाही, परंतु दरम्यान क्रिती आणि पुलकितच्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे की, दोघेही 13 मार्च रोजी लग्न करणार आहेत.  त्यांच्या लग्नाचे कार्ड देखील समोर आल्याने चाहत्यांनी हा अंदाज बांधायला सुरुवात केलीय.

क्रिती आणि पुलकित यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या कार्डमध्ये ॲनिमेटेड वधू-वर बनवले आहेत जे क्रिती आणि पुलकितसारखे दिसतात. या कार्डवर लिहिले आहे 'या दोघांच्या लग्नसोहळ्याची आम्ही वाट पाहू शकत नाही. पुलकित आणि क्रितीवर खुप प्रेम." या दोघांचं लग्नाचं कार्ड व्हायरल झाल्याने आता त्यांच्या चाहत्यांना लग्नाची उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :कृति खरबंदालग्नबॉलिवूड