Join us

प्रियंका चोप्राच्या भाऊ अन् वहिनीनं पाया पडत घेतला आशीर्वाद, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:12 IST

प्रियंकाच्या वहिनीचं नाव नीलम उपाध्याय असं आहे. नीलम ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Priyanka Chopra : 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राच्या घरी लगीनघाई सुरू आहे. प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा (Priyanka Chopra Brother Siddharth Chopra) हा अभिनेत्री नीलम उपाध्यायसोबत लग्नबंधनात अडकला आहे. भावाच्या लग्नासाठी प्रियंका सध्या भारतात आलेली आहे. सिद्धार्थ आणि नीलम यांचे वेडिंग फंक्शन मोठ्या थाटात पार पडल्याचे दिसून आले आहे. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यानं सर्वांची मने जिंकली आहेत.

realbollywoodhungama या पेजद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ आणि नीलम प्रियंकाचे आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या पायांना स्पर्श करताना दिसून येत आहेत.  या कृतीमधून त्यांचं प्रियंकावर असलेलं प्रेम आणि तिच्याप्रती असेलेला आदर पाहायला मिळाला. तर 'देसी गर्ल'ने या जोडप्याला आनंदाने आशीर्वाद देत घट्ट मिठी मारली.  प्रियंकाची वहिनी नीलम ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

 या व्हिडिओ समोर आल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी सिद्धार्थ आणि त्याची पत्नी नीलम उपाध्यायवर प्रेमाचा वर्षाव केलाय. नेटकऱ्यांनी त्यांच्या संस्कारांची प्रशंसा केली. प्रियंकाने भाऊ सिद्धार्थच्या लग्न समारंभासाठी अत्यंत सुंदर असा लूक केला होता. केशरी रंगाचा कुर्ता तिने परिधान केला. कुर्त्याच्या नेकलाइन आणि स्लीव्हजवर सोनेरी नक्षी होती. तिने त्याच रंगाचा सोनेरी जरी वर्क असलेला दुपट्टा निवडला आणि तिचा लूक पूर्ण केला.  

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूडलग्न