Join us

प्रिया मराठे अन् अभिजीतमध्ये वादाची ठिणगी?; सेटवर सगळ्यांसमोर प्रियाने अभिनेत्याच्या चेहऱ्यावर टाकलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 13:37 IST

Abhijeet khandkekar: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज कलाकार म्हणजे प्रिया मराठे (priya marathe) आणि अभिजीत खांडकेकर (abhijeet khandkekar). आजवर या दोन्ही कलाकारांनी उत्तम अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियताही ततकीच असल्याचं पाहायला मिळतं. सध्या ही जोडी तुझेच मी गीत आहे या मालिकेत काम करत असून दोन्ही कलाकारांनी सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना पडद्यामागील गमतीजमती सांगितल्या आहेत. मात्र, यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क अभिजीतच्या अंगावर पाणी टाकताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संभ्रमात पडले आहेत. नेमकं या दोघांमध्ये काय झालं? दोघांचा वाद झाला का? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. मात्र, प्रियाने खरोखर रागामध्ये अभिजीतच्या अंगावर पाणी टाकलं नसून तो मालिकेतील सीनचा एक भाग आहे.

एखाद्या सीनची कलाकार पडद्यामागे कशी तयारी करतात हे तिने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. प्रियाचा  हा BTS व्हिडीओ हा चांगला व्हायरल होत आहे.

दरम्यान,  ‘सीनसाठी अँक्टरना काय काय करावं लागतं आणि हे करताना मला अजिबात मज्जा आली नाही हे तर दिसतचं असेल’, अभिजीत मी तर तुझी मदत करत होते, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.  प्रिया मराठे ही ‘तुझेच मी गात आहे’  या मालिकेत अभिजीत खांडकेकर म्हणजे मल्हार कामतच्या बायकोची भूमिका साकारत आहे.  

टॅग्स :अभिजीत खांडकेकरप्रिया मराठेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार