Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ही तर मुक्तापेक्षा..." 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मिहीकाची रिप्लेसमेंट होताच चाहत्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:12 IST

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Premachi Goshta Serial : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान तसेच राज हंचनाळे, शुभांगी गोखले यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतायत. सुंदर आणि प्रेमळ नात्याची गुंफन या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.  सावनीसोबत आपलं लग्न होऊ नये म्हणून हर्षवर्धन सागर-मुक्ताच्या विरोधात मोठा डाव रचतो. मुक्ताच्या बहिणीला आपल्या जाळ्यात ओढतो आणि त्याचं खापर तो सागर-मुक्तावर फोडतो.

दरम्यान, या मालिकेत अभिनेत्री मृणाली शिर्केने मुक्ताच्या मावस बहिणीची भूमिका साकारली आहे. अशातच 'प्रेमाची गोष्ट'मध्ये नवे ट्विस्ट येत असताना अचानक अभिनेत्री मृणाली शिर्केने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.  त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आता मालिकेत  'कन्यादान' फेम अभिनेत्री अमृता बने मिहीकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

 

सोशल मीडियावर 'Marathi Serial Official' या इन्स्टाग्राम पेजवरून नव्या मिहीकाचे मालिकेतील चित्रीकरणाचे फोटो समोर आले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिकेत मिहीकाची रिप्लेसमेंट झाल्यामुळे त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट करून लिहलंय, "ही खूप मोठी वाटते, मिहीकाच्या पात्राला शोभत नाही. निदान शोभेल असं कॅरेक्टर घ्यायला हवं होतं". तर आणखी एका यूजरने "मुक्तापेक्षा हीच मोठी वाटत आहे" असं म्हणत कमेंट केली आहे. 

टॅग्स :तेजश्री प्रधान टेलिव्हिजनटिव्ही कलाकार