Join us

दीया मिर्झानंतर Preity Zinta कडेही ‘गुडन्यूज’? फोटो पाहून नेटीझन्सच्या उमटतायेत प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 19:41 IST

Preity Zinta Pregnancy Rumour : चंदेरी दुनियेपासून दूर असलेली अभिनेत्री प्रीती झिंटाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींनी बेबी बंपचे फोटो शेअर करत त्यांची प्रेग्नंसी जाहीर केली. विशेष म्हणजे चंदेरी दुनियेपासून दूर असलेली अभिनेत्री प्रीती झिंटाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. प्रीती झिंटा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगायला कारणीभूत ठरला आहे तिने परिधान केलेला पोलका डॉट ड्रेस.

जेव्हा अनुष्का शर्मा प्रेग्नंट होती तेव्हा तिने अशाच प्रकारचे पोलका डॉट ड्रेस परिधान करत तिची गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. त्यानंतर करिना कपूरदेखील दुस-यांदा प्रेग्नंट होती तेव्हा अशाच प्रकारे ड्रेस परिधान करत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. 

इतकेच नाही तर नताशा स्टॅनकोविकनेही गरोदरपणात पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. बॉलिवूड अभिनेत्रींचा पोलका डॉट ड्रेसिंग ट्रेंड पाहून अनेक टीव्ही अभिनेत्रींनी देखील असेच ड्रेस परिधान करत मॅटर्निटी फोटोशूट करताना दिसल्या होत्या. त्यामुळे पोलका डॉट ड्रेसवरुन अनेक मजेशीर मिम्सही व्हायरल झाले होते. त्यामुळे आता या ड्रेसला नेटीझन्सने गुड न्यूज वाला ड्रेस असेच नाव ठेवले आहे. 

प्रीती झिंटा देखील ब-याच दिवसानंतर मीडियासमोर आली तेव्हा ती पोलका डॉट ड्रेसमध्ये दिसली. प्रीतीचे हे फोटो शेअर होताच ती प्रेग्नंट आहे का? प्रीती लवकरच गुडन्यूज देणार आहेस का? असे विविध कमेंट करताना दिसतायेत. 

प्रिती झिंटाने का नाकारली 600 कोटींची संपत्ती?

एकदा 600 कोटी रूपयांची संपत्ती मिळवण्याची संधी प्रितीपुढे चालून आली होती. पण प्रितीने ही संपत्ती स्वीकारण्यास नकार दिला. होय, प्रिती ही शानदार अमरोहींची दत्तक मुलगी असल्याचे म्हटले जाते. शानदार अमरोही यांच्या निधनानंतर त्यांची 600 कोटींची संपत्ती प्रितीच्या नावावर होणार होती. कमाल अमरोही यांच्या अमरोही स्टुडिओच्या वादात प्रितीने शानदार अमरोहींची बाजू घेतली होती. त्यामुळेच 600 कोटींची संपत्ती प्रितीच्या नावावर करण्याचा निर्णय शानदार अमरोहींनी घेतला होता. मात्र, प्रितीने ही संपत्ती स्वीकारली नाही.

टॅग्स :प्रीती झिंटाअनुष्का शर्मा